
इगतपुरीनामा न्यूज, दि. 15
माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे नासिकच्या स्वामी ज्वेलर्सचेे राजेंद्र विसपुते यांच्यामार्फत क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना ड्रेस देण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच शाम चव्हाण, भोलेनाथ चव्हाण, कैलास मुसळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अमोल गवई होते. कबड्डी स्पर्धा सौरभ संघ विरुद्ध एकनाथ संघ यांच्यात झाली. ह्यात सौरभ संघ विजयी झाला.
विजयी संघात सौरभ चव्हाण, भूषण चव्हाण, नयनेश चव्हाण, ईश्वर चव्हाण, आदिनाथ आडोळे, ऋतिक चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, रोहित चव्हाण, एकनाथ चव्हाण, पवन चव्हाण, अनिकेत चव्हाण, अनिकेत म. चव्हाण, निलेश शिद, समीर भले या खेळाडूंचा समावेश होता. पालक समितीचे अध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी विजयी संघाला रोख रक्कमेचे बक्षीस देऊन सन्मानित केले. क्रीडा शिक्षक बी. बी. आहेर यांनी कब्बडी स्पर्धेचे पंच म्हणून, जय नाठे यांनी गुण लेखनाचे काम केले व दिलीप आहेरराव यांनी टाईमकिपरचे काम पाहिले. एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.