
इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुक्यातील जानोरी येथील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील कु. सोनाली चंद्रभान बोराडे आणि कु. रितेश चंद्रभान बोराडे हे दोघे राष्ट्रीय जिम्नॅस्टिक सुवर्ण पदक विजेते खेळाडू आहेत. १२ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी ह्या दोघांची भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा २३ ते २८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत कझाकिस्तान येथे होणार आहे. या स्पर्धेचा दोघांना येणारा अंदाजे खर्च ३ लाख २८ हजर इतका आहे. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा आहे. विविध नागरिकांकडून त्यांना शक्य तेवढी मदत केली जात आहे. यांना मदत केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्या तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे.
आर्थिक मदतीसाठी सोनाली चंद्रभान बोराडे हिचे
कोटक महिंद्रा बँक खाते क्रमांक 5246754366, IFSC CODE KKBK0001361 आणि Gpay / phonepay / paytm 7977051548 यावर आपली मदत पाठवता येईल

