इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
कझाकिस्तान येथे झालेल्या १२ व्या आशियाई जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी इगतपुरी तालुक्यातील जानोरीच्या खेळाडू सोनाली बोराडे व रितेश बोराडे यांचा जानोरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गावासह देशाचे नाव उंचावण्यासाठी ह्या खेळाडूंनी दिलेल्या योगदाणाचा अभिमान वाटतो असे सरपंच अर्जुन भोर, राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांनी म्हटले. विविध ग्रामस्थांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मनविसे विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, पत्रकार भास्कर सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश भोर, शांताबाई यंदे, ग्रामसेवक शरद रहाडे, जेष्ठ नागरिक गोविंद भोर, काळू भोर, गंगाराम पवार,कचरू भोर, बाळू भोर, शरद भोर, पंडित भोर, अशोक भोर, नामदेव करंडे, शिवाजी बोराडे, आकाश भोर, सोमेश्वर पवार, धनाजी भोर, अरुण भोर, खंडेराव भोर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.