इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथे कोरोना महामारीत गावातील कोरोनाग्रस्त रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायतने योग्य नियोजन केले. सर्वानुमते १० दिवस गाव बंदचा निर्णय घेऊन येथील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्याचे काम झाले. गावातील कायदा व सुव्यवस्था राखून याकाळात वेळोवेळी पोलिसांच्या मदतीसाठी येथील पोलीस पाटील यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. […]
किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ कोरोनामुळे रेल्वे गाड्यांतून गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्य जनतेला प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी वर्गांकरीता परवानगी देण्यात आली आहे. अधिकृत ओळख पत्र असल्या शिवाय प्रवाशांना तिकीट देण्यात येत नाहीत. असे असताना इगतपुरी व कसारा रेल्वे स्थानकांतुन अनाधिकृत बाहेरील फेरीवाले चालत्या मेल – एक्सप्रेस […]
वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ आदिवासी खावटी लाभार्थींची निवड करतांना शासनाने अल्पभुधारक, अत्यल्प भुधारक, रोहयो मजुर यानुसार लाभार्थीची निवड केलेली आहे. मात्र अनेक भूमीहीन, प्रकल्पग्रस्त व गरजु आदिवासींना लाभ मिळालेला नाही. या बाबत शासनदरबारी पाठपुरावा करून सर्वांना लाभ मिळवुन देणार आहे. विभक्त कुटुंबियांना लवकरच स्वतंत्र पिवळे रेशनकार्ड देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार हिरामण खोसकर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार इगतपुरी तालुक्यात आज एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नाही. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांपैकी एकही रुग्ण कोरोनामुक्त झालेला नाही. त्यामुळे रुग्ण संख्या ५ वरच स्थिर आहे. दरम्यान बऱ्याच दिवसांनी आज नवीन रुग्ण संख्या शून्यावर आल्याने दिलासा मिळालेला असला तरी पाचवर स्थिर असलेली रुग्णसंख्या कोरोनामुक्तीच्या मार्गातला […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ इगतपुरी तालुक्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णसंख्या ५ वरचा भक्कमपणे स्थिर झाली आहे. आज २ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार नव्या २ व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाला इगतपुरी तालुक्यात भरघोस […]
इगतपुरीनामा न्युज, दि. ५ आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आज २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर आज २ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकंदरीत ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसात इगतपुरी तालुका निश्चितपणे कोरोनामुक्त होईल असा विश्वास इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या सध्या पाचावर स्थिरावली असून दृष्टिपथात असलेली कोरोनामुक्ती या ५ मुळे एक एक दिवस लांबणीवर पडतांना दिसत आहे. आज हाती आलेल्या अहवालानुसार २ नवीन रुग्णांची भर पडली असून २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे गेले ४ दिवस कायम असलेली ५ ही रुग्णसंख्या आजही कायम आहे. हत्ती गेला आणि […]
इगतपुरीनामा न्युज, दि. ११ कोरोनामुक्तीच्या आनंददायी पर्वाला लांबवणारी ५ वरील स्थिर रुग्णसंख्या आज सलग चौथ्या दिवशी कायम राहिली. यामुळे कोरोनवरील विजयाचा क्षण मात्र आणखी काही दिवस ढकलला गेला आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या अहवालानुसार ३ नव्या रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ३ जुन्या कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात […]
मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरेसंपर्क क्र. 9011720400चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी ) विद्यार्थी मित्रांनो,आपण सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु महाविद्यालयीन परीक्षा, स्पर्धा परीक्षा आदींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. योग्य नियोजन हाच तर परीक्षेचा आत्मा आहे. नियोजन नसेल तर कितीही […]
लग्न सोहळ्यांमधील गर्दी टाळण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन इगतपुरीनामा न्यूज, दि. १० नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करताना गर्दी करू नये. यासारख्या सोहळ्यांमुळे रुग्ण अधिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असून पोलीस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे, जास्त गर्दी होत असेल तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी […]