कोरोनामुक्तीला ५ मुळे लागतोय ब्रेक

इगतपुरीनामा न्युज, दि. ११

कोरोनामुक्तीच्या आनंददायी पर्वाला लांबवणारी ५ वरील स्थिर रुग्णसंख्या आज सलग चौथ्या दिवशी कायम राहिली. यामुळे कोरोनवरील विजयाचा क्षण मात्र आणखी काही दिवस ढकलला गेला आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या अहवालानुसार ३ नव्या रुग्णांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ३ जुन्या कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दिवस अखेर संपूर्ण तालुक्यात ५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. नागरिकांकडून इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याची अपेक्षा असून सलग स्थिर राहणारी रुग्णसंख्या विरजण घालतांना दिसते. 

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!