वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
आदिवासी खावटी लाभार्थींची निवड करतांना शासनाने अल्पभुधारक, अत्यल्प भुधारक, रोहयो मजुर यानुसार लाभार्थीची निवड केलेली आहे. मात्र अनेक भूमीहीन, प्रकल्पग्रस्त व गरजु आदिवासींना लाभ मिळालेला नाही. या बाबत शासनदरबारी पाठपुरावा करून सर्वांना लाभ मिळवुन देणार आहे. विभक्त कुटुंबियांना लवकरच स्वतंत्र पिवळे रेशनकार्ड देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.
तालुक्यातील काळूस्ते येथे प्रातिनिधिक स्वरूपात २० आदिवासी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट आमदार खोसकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यानंतर टप्याटप्याने सर्व लाभार्थ्याना या खावटी कीटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विभागाने दिली. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते काळुस्ते येथे आदिवासी कुटुंबांना ‘ खावटी ‘ अनुदान योजने अंतर्गत जिवनाश्यक वस्तुंचे खावटी किट वाटप करण्यात आले. यात २ हजार रूपये रोख स्वरूपात व २ हजार रूपये किंमतीचे जीवनावश्यक वस्तु साहित्य किट असे आज २० लाभार्थ्याना वाटप करण्यात आले.
कार्यकमप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, सहाय्यक प्रकल्प आधिकारी गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य जनार्दन माळी, माजी सरपंच अनिता घारे, गोपाळ लहांगे, रामदास धांडे, सभापती सोमनाथ जोशी, बाळासाहेब गाढवे, पांडुरंग शिंदे, गटनेते विठ्ठल लंगडे, निवृत्ती कातोरे, अरुण गायकर, यशवंतराव घारे, गंगाराम पाटील, ज्ञानेश्वर घारे, कैलास घारे, वनिता गवारी, कविता खाडे, खंडू खोकले, मुख्याध्यापक फुंदे, हिरामण कौटे, प्रकाश घारे, रामकिसन घारे यांच्यासह शासकीय आश्रम शाळेचे शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते.