इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
इगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या सध्या पाचावर स्थिरावली असून दृष्टिपथात असलेली कोरोनामुक्ती या ५ मुळे एक एक दिवस लांबणीवर पडतांना दिसत आहे. आज हाती आलेल्या अहवालानुसार २ नवीन रुग्णांची भर पडली असून २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे गेले ४ दिवस कायम असलेली ५ ही रुग्णसंख्या आजही कायम आहे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले अशी गत सध्या तालुक्याच्या कोरोनामुक्तीच्या बाबतीत होत आहे. दरम्यान रुग्ण संख्या कमी होत नसली तरीसुद्धा वाढही होतांना दिसत नाही हीच तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. कोरोनाविषयी सगळ्या नियमांचे पालन करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.