उभाडे आरोग्य उपकेंद्रात एकाच दिवशी ५५० नागरिकांचे लसीकरण : काळूस्ते आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दमदार कामगिरी

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जोरदार प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत उपकेंद्र उभाडे येथे आज लसीकरणाच्या सत्रात ५५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. काळूस्ते आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दमदार कामगिरी केल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी त्यांचे […]

इगतपुरी तालुक्यात एकाच दिवशी 2 हजार 500 व्यक्तींना कोविड लसीकरणाचा उच्चांक : सभापती जोशी, उपसभापती लंगडे यांच्याकडून आरोग्य विभागाचे कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ इगतपुरी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांत सोमवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने नवा उच्चांक स्थापित केला आहे. संपूर्ण तालुक्यात आज एकाच दिवशी २ हजार ५०० पेक्षा जास्त व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने ७७० जणांना लस देऊन उच्चांक केला आहे. काळुस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र […]

कोरोना साथरोग काळात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे कार्य जनतेस जीवदान देणारे – रवींद्र परदेशी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन मधुकर आढाव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने निवृत्त आरोग्य कर्मचारी सन्मान सोहळा व सभासद पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला. गुगुल मिट ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे प्रातिनिधिक स्वरुपात नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य […]

धर्माचे साधन असणाऱ्या मानवी शरीराला निरामय ठेवण्यासाठी आरोग्य उपकेंद्र उपयुक्त : मठाधिपती घुले ; आमदार खोसकर खासदार गोडसे यांच्याकडून पाडळी देशमुख ग्रामपंचायतीचे कौतुक

पाडळी देशमुखला आरोग्य उपकेंद्र भूमिपूजन आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १० “शरीर रक्षणम् खलू धर्मसाधनं” ह्या प्रमाणे धर्माचे साधन असणारे मानवी शरीर उत्तम आणि निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य उपकेंद्र उपयोगी आहे. मानवी हृदयातील स्थित असणाऱ्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी रुग्णवाहिका फायदेशीर आहे. पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, ग्रामपंचायत आणि जेएमटी […]

इगतपुरी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा १ लाखांचा टप्पा पूर्ण : गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून आरोग्य यंत्रणेचे कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ इगतपुरी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा आज १ लाखाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे रुग्णालय आणि दोन ग्रामीण रुग्णालयामधील आरोग्य यंत्रणेने लसीकरणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडला. कोरोना रुग्ण संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इगतपुरी, घोटी ग्रामीण रुग्णालय, रेल्वे रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीवऱ्हे, काननवाडी, […]

वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे सगळी आरोग्य यंत्रणा सलाईनवर

संतापलेल्या नागरिकांची रिक्त पदे भरण्याची मागणी इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि आरोग्यावर ताण असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून  वाडीवऱ्हे ओळखले जाते. कोरोना काळापासून तर ह्या आरोग्य केंद्राला अतिरिक्त कामे करावी लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळात तेरावा महिना काय असतो ह्याचे मोठे उदाहरण म्हणजे वाडीवऱ्हे आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्रासह अनेक उपकेंद्रांत […]

वाढोली येथे लसीकरण संपन्न : चार गर्भवती महिलांना लसीकरण

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथे छोट्याशा गावात एकाच दिवसात ११३ व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. ४ गर्भवती महिलांचे समुपदेशन करून लसीकरण करण्यात आले. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत  वाढोली येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात गावात झालेल्या ह्या लसीकरणाला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. ४५ वर्षावरील लाभार्थ्यांनी दुसरा डोस तर १८ ते ४४ […]

नाभिक समाज विकासासाठी केश शिल्पी बोर्डाचे तातडीने पुनर्गठन करावे : विविध मागण्यांसाठी सलून असोसिएशनकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र राज्यभरातील नाभिक बांधव आणि व्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. भाड्याने घेतलेली दुकाने आणि घरे यामुळे उत्पन्नहीन झालेल्या नाभिक बांधवांना शासनाकडून कोणतीही मदत आणि दिलासा दिला गेलेला नाही. यामुळे नाभिकांमध्ये शासनाबाबत तीव्र स्वरूपाचा असंतोष उग्र स्वरूप धारण करीत आहे. इतर प्रवर्गासाठी शासनाने पुढे येऊन दिलेली मदत नाभिक बांधवांना लागू […]

रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने कोरोना योध्दा के. डी. दोडामनी यांचा सन्मान

संदीप कोतकर, इगतपुरीनामा न्यूज दि. ११ कोरोना महामारीत इगतपुरी रेल्वे स्थानकावरील आर. आर. कंत्राटदारचे संचालक के. डी. दोडामनी यांनी प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांची चांगली सेवा केली. याबद्दल त्यांना रेल्वे प्रवासी संघाने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. इगतपुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, प्रवासी संघाचे संस्थापक अय्याज खान, माजी नगरसेवक बाळासाहेब गांगुर्डे यांच्या हस्ते रेल्वे स्थानकात […]

शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. १० : कोविड संसर्ग पूर्णपणे गेला नसल्याने सध्याच्या वातावरणात परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे, याच पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालयाने अकरावीची सीईटी परीक्षा रद्द केली आहे. तोच संदर्भ घेवून आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करावी अशी मागणी […]

error: Content is protected !!