इगतपुरी तालुक्यात एकाच दिवशी 2 हजार 500 व्यक्तींना कोविड लसीकरणाचा उच्चांक : सभापती जोशी, उपसभापती लंगडे यांच्याकडून आरोग्य विभागाचे कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

इगतपुरी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांत सोमवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने नवा उच्चांक स्थापित केला आहे. संपूर्ण तालुक्यात आज एकाच दिवशी २ हजार ५०० पेक्षा जास्त व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. काननवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने ७७० जणांना लस देऊन उच्चांक केला आहे. काळुस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र ६६०, धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ६५०, इगतपुरी ग्रामीण रुग्णालय ३००, वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र २९०, बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र २७०, घोटी ग्रामीण रुग्णालय २००, कऱ्होळे उपकेंद्र अंतर्गत पिंगळेवाडी येथे १९४ जणांना लसीकरण झाले. विक्रमी लसीकरणाचा वेग आगामी काळात वाढणार आहे. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. स्वरूपा देवरे, घोटीचे अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते यांनी उच्चांकी लसीकरण कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय आरोग्य यंत्रणेला बहाल केले आहे. इगतपुरीचे सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे यांनी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले असून त्यांच्या कार्याचा अभिमान वाटत असल्याचे कौतुकोद्गार काढले आहेत.

लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी इगतपुरीचे  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. स्वरूपा देवरे, घोटीचे अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली ठाकरे, डॉ. विजय माळी, डॉ. विश्वनाथ खतेले, डॉ. संदीप वेढे, डॉ. दीपाली खैरनार, डॉ. चित्रा वेढे, डॉ. सोनाली कोळी, डॉ. घनश्याम बांबळे, डॉ. रवी क्षीरसागर, डॉ. मधूलिका क्षीरसागर, डॉ. सागर थोरात, डॉ. तेजस्वीनी मेदडे, डॉ. काळे,  डॉ. नाईकवाडी, डॉ. लचके, डॉ. अहिरे यांच्या पथकांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

आरोग्य सहाय्यक रमेश आवारी, आरोग्य पर्यवेक्षिका सटन लॉड्रीक, आरोग्य सहाय्यक विजय सोपे, मंगेश कुलकर्णी, संतोष लेकुले, आरोग्यसेवक तुफेल खान, मानसिंग पावरा, परशराम चौधरी, संदीप दिवटे, पंढरी इंगळे आदींसह विविध वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

कोरोनाचा संसर्ग कायमचा हद्दपार करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. अधिकाधिक लाभार्थ्यांनी लसीकरण करावे यासाठी आमची आरोग्य यंत्रणा अतिशय सक्षमतेने काम करीत आहे. जोराचा पाऊस आणि अतिरिक्त कामे करता करता ह्या राष्ट्रीय कार्यक्रमात आमच्या आरोग्य विभागाने मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील उच्चांकी काम उभे करण्याचे संपूर्ण श्रेय माझ्या तमाम आरोग्य यंत्रणेला बहाल करतो.
- डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी इगतपुरी
इगतपुरी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी आदींनी डोळ्यांत तेल घालून कोरोना विरोधातला लढा बळकट केला आहे. तब्बल २ हजार ५०० नागरिकांना लस देऊन इगतपुरी तालुक्यात उच्चांक साधला आहे. तालुक्याच्या वतीने आम्ही यंत्रणेचे कौतुक करतो.

- सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!