ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथे छोट्याशा गावात एकाच दिवसात ११३ व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. ४ गर्भवती महिलांचे समुपदेशन करून लसीकरण करण्यात आले. अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत वाढोली येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात गावात झालेल्या ह्या लसीकरणाला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.
४५ वर्षावरील लाभार्थ्यांनी दुसरा डोस तर १८ ते ४४ वयोगटातील ग्रामस्थांनी पहीला डोस घेतला. लसीकरण होणार असल्याचे कळताच गावातील लोकांनी सकाळी ७ वाजेपासुन आरोग्य वर्धिनी केंद्रास रांगा लावल्या. आरोग्य विभागाचे कर्मचारी येण्या अगोदरच ग्रामस्थांनीच कर्मचारी म्हणुन भुमिका बजावत लोकांना नंबरावर रांगेत उभे केले. यादी तयार केल्याने गर्दी असूनही गोंधळ झाला नाही. आरोग्य कर्मचारी येताच आरोग्य सेवक किशोर अहिरे यांनी उपलब्ध लसी व लसीकरणाचा प्राधान्य क्रम सांगुन गावकऱ्यांनी तयार केलेली रांगेतील यादी ग्राह्य धरून लसीकरण सुरूवात केली. लसीकरण कार्यक्रम तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. शिबीर यशस्वी करण्यासाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा सोनवणे, डॉ. आशिष सोनवणे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. वृषाली पाटील , आरोग्य सेविका श्रीमती गोडे, आरोग्य सेवक किशोर आहिरे, तालुका डेटा ऑपरेटर अमोल दिक्षित, आशासेविका पार्वती महाले, कामिनी शिंदे, यमुना पारधी, मंगल भगत, मंगल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.