इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेची ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन मधुकर आढाव यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने निवृत्त आरोग्य कर्मचारी सन्मान सोहळा व सभासद पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला. गुगुल मिट ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे प्रातिनिधिक स्वरुपात नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रसिंह परदेशी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
मुख्य अतिथी म्हणुन उपस्थितांना संबोधित करतांना नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी नमूद केले की, आरोग्य कर्मचारी पतसंस्था सभासदांना ६ लाख रुपये तात्काळ कर्ज व विमा सुरक्षा कवच योजना प्रभावीपणे राबवत आहेत ही अभिनंदनीय बाब आहे. कोरोना साथरोग काळात ग्रामीण भागातील जनतेस आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून एक- एक महिना दूर राहुन खरे कोरोना योद्धा म्हणुन जनतेची सेवा केली। त्याबद्दल आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. आरोग्य कर्मचारी यांच्या सर्व संवर्गाच्या कालबद्ध पदोन्नती व नियमित पदोन्नतीबाबत पुढील आठवड्यातील तीन दिवसात प्राधान्याने पदोन्नती समितीच्या मार्फत मान्यता देण्याची कार्यवाही करण्याची ग्वाही रवींद्र परदेशी यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, माझे वडील स्व. डॉ. प्रकाश आहेर यांनी आपलं आयुष्य कर्मचारी संघटना व पतसंस्था यांना वेळ देऊन आरोग्य सेवेतील घटकांच्या सेवेसाठी व्यथित केली. आरोग्य कर्मचारी पतसंस्था थोड्या अवधीतच ८५० च्या पुढे सभासद करुन स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत झाली आहे ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले.
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या ५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्तास मान्यता देणे, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाची नफा वाटणीस मान्यता देणे, पतसंस्थेस ३१मार्च,२०२१ अखेर कमी जास्त झालेल्या खर्चास कार्योत्तर मान्यता देणे, पतसंस्थेच्या सन २०२१-२२च्या अंदाज पत्रकास मान्यता देणे, सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत करणे व पतसंस्थेच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे सनदी लेखापाल यांनी केलेल्या लेखा परीक्षणाचे वाचन करुन लेखा परीक्षण अहवालास मान्यता देणे आदी विषयांची ऑनलाइन पद्धतीने सभासदांनी सहभाग नोंदवुन सखोल चर्चा करुन एकमुखाने मान्यता देण्यात आली.
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाइन सभेस व्हॉईस चेअरमन श्रीकांत अहिरे, सचिव तुषार पगारे, संचालक जी. पी.खैरनार, फैय्याज खान, विजय देवरे, विजय सोपे, जयवंत सूर्यवंशी, जयंत सोनवणे, प्रशांत रोकडे, संजय पगार, गोरक्षनाथ लोहकरे, सुनिल जगताप, सुलोचना भामरे व सोनाली तुसे नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे संचालक अनुक्रमे मोठाभाऊ ठाकरे व दिपक अहिरे यांचेसह सेवानिवृत्त जेष्ठ सभासद सुभाष कंकरेज, संजय संवत्सरकर, बाळासाहेब चौधरी, अमृत खैरनार, संतोष खालकर, सचिन अत्रे, अनिल राठी, जयमाला सुतार, जगन्नाथ जमधडे, हेमंत साळुंके, कैलास देवरे, विनया महाजन, एकनाथ वाणी, दिनेश ठाकरे, विजय चौधरी, महेंद्र गांगुर्डे, किरण पवार, दिनेश कुलकर्णी, प्रशांत भडांगे, प्रतीक सोनवणे, संदीप पवार, मंगला खैरनार, नलु खरक, छाया चौधरी, सुभाष चव्हाण, निलेश नंदन,अमृत खैरनार, महेश पाटील, विनोद चव्हाण, सुनील देवकर, प्रशांत सोनवणे यांनी सभेतील चर्चेत भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला.
सभेचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन मधुकर आढाव यांनी केले तर संस्थापक चेअरमन तथा मुख्य प्रवर्तक जी. पी. खैरनार यांनी आरोग्य कर्मचारी यांच्या समस्यांबाबत सविस्तर निवेदन केले. संस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव तुषार पगारे यांनी केले तर वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत अहिरे यांनी मानले.
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक ही संस्था आपल्या सभासदांना जमा शेअर्स रकमेवर ५ टक्के नफा वाटणी जाहीर करत आहे. नफा वाटणी सोबत आरोग्य कर्मचारी विमा कवच माध्यमातुन सभासदांचे आकस्मित निधन झाल्यास त्याच्या वारसास १ एप्रिल २०२२ पासुन ४ लाखांपर्यंत विमा देण्यात येणार आहे.
- मधुकर आढाव, चेअरमन