निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला जोरदार प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत उपकेंद्र उभाडे येथे आज लसीकरणाच्या सत्रात ५५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. काळूस्ते आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दमदार कामगिरी केल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
रेल्वे-विमान प्रवास व सरकारी कार्यालयांमध्ये लसीकरण सक्तीचे केल्याने नागरिकांचा कल लसीकरणाकडे वाढला आहे. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याने नागरिक लस घ्यायला प्रतिसाद देत आहेत. १८-४४ वर्षे वयोगटातील नागरिक प्रबोधन व जनजागृती करून लसीकरणाला प्रोत्साहन देत आहेत.
काळूस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश काळे, डॉ. सोनाली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण आयोजित केले होते. लसीकरणकामी आरोग्य पर्यवेक्षिका सटन लॉड्रीक, आरोग्य सहाय्यक रमेश आवारी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. चित्ते, श्रीमती सोनवणे, आरोग्य सेविका अनुसया गवळी, गुजर, आरोग्य सेवक सागर दिंडे, रवी पाटील, प्रदीप बच्छाव, उत्तम घोरपडे, संतोष लेकुले, आशा पर्यवेक्षक सीमा तोकडे, अंगणवाडी आशा योगिता मोसे, मीना लोते, नंदा बोराडे, बेबी बोराडे, गोरख बगाड, मालपुरे यांच्यासह ग्रामपंचायत उभाडे यांचे शिबिर यशस्वीतेसाठी साहाय्य लाभले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमात आज उभाडे येथे विक्रमी लसीकरण झाले. नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामात हुरूप निर्माण होतो. आमच्या कार्यक्षेत्रात सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश काळे, डॉ. सोनाली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत.
- रमेश आवारी, आरोग्य सहाय्यक