प्रग्या फिल्मस् च्या तर्फे इगतपुरीत कोरोना योध्दा सन्मान सोहळा ; सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या हस्ते कोरोना योद्धयांचा सन्मान

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ कोरोना महामारीच्या संकट काळात तालुक्यातील अनेक कोरोना योद्धांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन गरजुंना सर्वतोपरी मदत केली. यात आरोग्यसेवा, धान्य वाटप आदी मदत कार्य केले तर अनेकांनी आदिवासी वाडया वस्त्या दत्तक घेऊन सामाजिकता जोपासत मानवधर्म व राष्ट्रप्रेम कायम ठेवले. अशा कोरोना योद्धांचा सन्मान म्हणुन प्रग्या फिल्मस् पब्लिकेशनच्या वतीने इगतपुरी येथील हॉटेल […]

अतिदुर्गम ग्रामीण भागात लसीकरणाचा ओघ वाढला : काळूस्ते आरोग्य केंद्रामार्फत एकाच दिवशी ६३० नागरिकांचे लसीकरण

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ इगतपुरी तालुक्यातील अति दुर्गम डोंगरी भागात नागरिकांचा ओघ कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे वाढला असून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत खैरगाव उपकेंद्रातील खैरगाव, शेणवड बुद्रुक, पेहरेवाडी आदी वाड्यांमध्ये लसीकरण सत्र पार पडले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्तेचे वैद्यकीय […]

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व […]

पिंपळगाव मोर येथे लसीकरणाला विक्रमी प्रतिसाद : पहिल्या दोन सत्रांपेक्षा ह्या सत्रात तिप्पट लसीकरण

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत पिंपळगाव मोर लसीकरण सत्र पार पडले. याआधी झालेल्या सत्रांच्या तिप्पट तिप्पट प्रतिसाद लसीकरणाला मिळाला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांचा कल लसीकरणाकडे वाढला आहे. एकाच दिवशी पहिल्या व दुसऱ्या डोस एकूण ३८६ नागरिकांनी लसीकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत एकाच दिवशी देवळे, […]

वाडीवऱ्हे आरोग्य केंद्राच्या पथकाच्या वाहनाला अपघात : वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ९ आरोग्य कर्मचारी जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ कोरोना लसीकरण करून परतत असणाऱ्या वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय वाहनाला पाडळी देशमुखजवळ अपघात झाला आहे. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ह्या वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने ठोकल्याने हा अपघात झाला. आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला ही घटना झाली. ह्या अपघातात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ९ आरोग्य कर्मचारी जखमी झाले आहेत. जगतद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मोफत […]

सशक्त नाशिक जिल्ह्यासाठी नागरिकांची साथ गरजेची – पालकमंत्री छगन भुजबळ : घोटी येथील ऑक्सिजन प्लांटचे ना. भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा करणे हे आपले पहिले उद्दिष्ट असणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या […]

अखेर पास्ते येथील आरोग्य कर्मचारी मारहाण प्रकरणी दोघांवर ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी दाखवले एकीचे बळ

उद्यापासून जिल्हाभर ठप्प झालेले कोविड लसीकरण होणार सुरू इगतपुरीनामा न्यूज, दि. २० सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे कोविड लसीकरण सत्राच्या सरकारी कामकाजात हस्तक्षेप करुन महिला व पुरुष आरोग्य कर्मचारी यांना जीवघेणा हल्ला करुन मारहाण करणाऱ्या २ संशयित व्यक्तींवर अखेर कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोग्य कर्मचारी महेंद्र हिंमतराव सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी भारतीय […]

प्रमोद परदेशी यांच्यासारख्या कर्तृत्ववान शिक्षकांमुळे शिक्षणाचा प्रसार सुलभ : ना. बाळासाहेब क्षीरसागर

प्रमोद परदेशी यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार वितरित इगतपुरीनामा न्यूज, दि. २० नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार परिणामकारक झाला. नवनवीन उपक्रमांमुळे शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी फायदेशीर ठरली. यामुळेच “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” अनेकांसाठी दिशादर्शक ठरला. प्रमोद परदेशी यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करतो असे गौरवोद्गार नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. […]

“पुढच्या वर्षी लवकर या…! इगतपुरी तालुक्यात गणरायाला भक्तांचा निरोप

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोना महामारीसह सर्व संकटांचा नाश करावा अशी प्रार्थना गणेशभक्तांनी गणरायाला केली. माणिकखांब येथील सार्वजनिक गणपती आणि घराघरातील गणपतींचे विसर्जन दारणा नदीच्या पात्रात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. पारंपरिक भजनांच्या गजरात टाळ मृदंगाच्या आवाजात विघ्नेश्वराला निरोप देण्यात आला. यावेळी महिला, युवतींनी रिंगण घालून फुगड्या खेळल्या. […]

आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर ३५३ दाखल करा : पोलीस संरक्षण असेल तरच होणार लसीकरण सत्र

सोमवारी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा आरोग्य कर्मचारी संघटनेचा इशारा इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या वेळी सिन्नर तालुक्यातील पास्ते गावात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झालेली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून नाशिक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे कृत्य समाजकंटकांनी केले आहे. ह्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य […]

error: Content is protected !!