अंध दिव्यांग महिलेच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी वन अधिकारी आणि इगतपुरीनामातर्फे मोफत गॅस कनेक्शन : महिला दिन आणि इगतपुरीनामा न्यूजच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ आधीच अंध दिव्यांग असल्याने चुलीचा धूर डोळ्यांतून अश्रू आणतो. म्हणून ह्या परिवाराला मदत करणे आवश्यक आहे. म्हणून जागतिक महिला दिन आणि इगतपुरीनामा न्यूज पोर्टलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील अंध महिलेच्या कुटुंबाला गॅस कनेक्शन देण्यात आले. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, इगतपुरीचे वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, इगतपुरीनामाचे मुख्य संपादक भास्कर […]

दमदार, कसदार आणि दैदिप्यमान कार्यामुळे गोरख बोडके पुणे येथे कार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित : कोरोनाकाळात हजारो लोकांचे आशीर्वाद लाभले हाच माझा पुरस्कार : गोरख बोडके

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ कोरोनाचा खडतर काळ…ऑक्सिजनचा जीवघेणा तुटवडा..पेशंटच्या बेडचा अभाव…इंजेक्शन अन प्लाझ्माचे दुखणे… आणि जगण्यासाठी काय करायचे याची भ्रांत…!!! अशा बिकट काळात इगतपुरी तालुक्यासह इतरही भागाला जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या रूपाने खरा परमेश्वरी देवदूत लाभला. ह्या संकटकाळात जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणारे लोक […]

शिरसाठे गावात बोलू लागल्या भिंती आणि झाडे : पर्यावरणाची कास धरण्यासाठी उघडली मनामनाची कवाडे

पर्यावरणपूरक शिरसाठे गावाची यशोगाथा २ भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ह्या गावाने पर्यावरणपूरक विचारांच्या प्रभावाने उभे केलेले काम सर्वांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. यासोबतच पर्यावरणविषयक जनजागरण आणि लोकसहभाग यामुळे कौतुकास्पद कामगिरी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संपूर्ण शिरसाठे वासीयांना सॅल्युट केला आहे. ह्या गावासारखे दुर्गम […]

सर्वोत्तम कामगिरीसाठी गोरख बोडके यांना राज्यस्तरीय सन्मानाचा पुरस्कार घोषित : पुणे येथे ५ मार्चला होणार भव्यदिव्य पूरस्कार वितरण सोहळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनकडून दरवर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तिमत्वाला दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार जननायक गोरख बोडके यांना घोषित झाला आहे. गोरख बोडके हे सध्या नाशिक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम पाहत असून ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात अव्वल कामगिरी करून जनमानसात […]

८ हजार फळझाडे लावून संगोपनाचा घेतला वसा ; वाचून बघा शिरसाठे गावाचा इतिहास असा : पर्यावरणपूरक कामांमध्ये शिरसाठे ग्रामपंचायतीने केले दैदिप्यमान कार्य

पर्यावरणपूरक शिरसाठे गावाची यशोगाथा १ भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे हे १ हजार २८० पेक्षा अधिक लोकसंख्या व 255 घरे असलेले पर्यावरण पूरक गांव आहे. गावाला गायरान मुबलक असलेली गायरान जमीन किमान ५० वर्षापासून गुरे चराईसाठी वापरण्यात येत होती. ह्या जमिनीमध्ये आजूबाजूचे शेतकरी बांध कोरून अतिक्रमण करत होते. अशा ओसाड […]

काय सांगता…? इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावात साकारला अंधारात लख्ख प्रकाशणारा चमकदार रस्ता : महाराष्ट्र राज्यातील पहिल्याच चकाकणाऱ्या रस्त्याला पाहण्यासाठी वाढतेय गर्दी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ फक्त परदेशात आणि लहानपणी परीकथेमध्ये अनेकांनी चकाकणारा रस्ता ऐकलेला असेल. ह्या प्रकाशमान रस्त्याबाबत अनेकांना कायमच कुतूहल असते. अशा प्रकारचा चमचमीत रस्ता पोलंड ह्या देशामध्ये असल्याचे ऐकिवात आहे. मात्र इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम मोडाळे गावात अंधार पडल्यावर चक्क प्रकाशमान आणि उजळून टाकणारा रस्ता तयार करण्यात आला आहे. ह्या रस्त्यावरून चालणाऱ्यांसह वाहनधारकांना जणू काही […]

घराघरात आणि गावागावात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह ; बालगोपाळ बनले बाल शिवराय आणि मावळे : २ महिन्याचा मल्हारराजे बनला “बाळ शिवराय” ; सगळीकडे होतेय कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ सिहांसनाधीश्वर…योगीराज… श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा अनेकानेक घोषणा देत शेकडो शिवभक्त गावागावात शिवजयंती साजरी करीत आहे. घराघरात शिवाजी महाराजांच्या जन्मानिमित्त अभूतपूर्व उत्साह संचारलेला असून इगतपुरी तालुक्यात जणू काही शिवमय वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी विविध कार्यक्रम, व्याख्याने, सामाजिक कार्यक्रम आणि विचारांची देवाणघेवाण करणारे कार्यक्रम होताहेत. मिरवणुकांत सहभागी […]

शाळा सुरू झाली.. पण मध्यान्ह भोजन योजना मात्र अजूनही बंदच!

इगतपुरीनामा न्यूज दि. १६ : कोविडमुळे जवळपास पावणेदोन वर्षे बंद असलेल्या शाळा आता नियमितपणे भरू लागल्या आहेत. मध्यंतरी शाळा उघडल्या असल्या तरी कोरोना प्रादुर्भाव पुन्हा बळावल्याने शाळा बंद करण्याची वेळ आली होती, मात्र त्यानंतर आता फेब्रुवारीच्या सुरुवातीला शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश शाळा पूर्ण विद्यार्थी क्षमतेने सुरू झाल्या आहेत, काही ठिकाणी अगदी […]

एकदम झकास : मानवेढे ग्रामपंचायतीने बनवले २ एकरात उत्तर महाराष्ट्रातील अव्वल क्रिकेट मैदान : सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव भागडे यांच्याकडून गावाला अनोखी भेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ छंदाला अजिबात मोल नसते. आपली हौस भागवण्यासाठी वाट्टेल तेवढा खर्च करण्याची अनेकांची तयारी असते. यामध्ये अनेकजण सामाजिक कार्य करतांना छंद आणि क्रीडा प्रकाराला विविध साहाय्य करीत असतात. मात्र त्यामध्ये शाश्वत सुविधा नसल्याने तात्कालिक मदत फक्त होत असते. कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम होण्याकडे नेहमीच कल असणारी इगतपुरी तालुक्यातील मानवेढे ही ग्रामपंचायत ओळखली […]

नसानसात जनसेवा भिनलेला टाकेद परिसराचा “भगवान” :
आदिवासींचा पाठीराखा, युवकांचा लाडका बिगबॉस, वारकऱ्यांचा कैवारी आणि सामान्य नागरिकांना आधार

भगवान खंडू जुंदरे. निर्व्यसनी जीवन जगणारा कष्टकरी, वनवासी, आदिवासींचा पाठीराखा, युवकांचा लाडका बिगबॉस, वारकऱ्यांचा कैवारी आणि सामान्य नागरिकांना आधार देणारा भाऊ. इगतपुरी तालुक्यातील टाकेद आणि खेड परिसरात शेकडो कुटुंबांच्या घराघरांत प्रेमाने, आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे भगवान जुंदरे. जनसेवा नसानसात भिनलेल्या भगवान जुंदरे यांनी उभे केलेले सेवाकार्याचे सामर्थ्य इगतपुरी तालुक्यात अभूतपूर्व आहे. शिळी भाकरी खाऊन […]

error: Content is protected !!