इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
आधीच अंध दिव्यांग असल्याने चुलीचा धूर डोळ्यांतून अश्रू आणतो. म्हणून ह्या परिवाराला मदत करणे आवश्यक आहे. म्हणून जागतिक महिला दिन आणि इगतपुरीनामा न्यूज पोर्टलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील अंध महिलेच्या कुटुंबाला गॅस कनेक्शन देण्यात आले. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, इगतपुरीचे वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, इगतपुरीनामाचे मुख्य संपादक भास्कर सोनवणे आदींनी सामाजिक दातृत्वातून अंध महिलेला आज एचपी गॅसचे कनेक्शन, १ सिलेंडर, इतर साहित्य यांचे वाटप केले. यामाध्यमातून कुटुंबाला आत्मनिर्भर करण्यासाठी साहाय्य मिळाल्याची भावना अंध महिलेने व्यक्त केली. एचपी गॅस घोटी यांनी ह्या कामाला आपले योगदान दिले.
टिटोली येथील अंध दिव्यांग महिला वृषाली भटाटे आणि पती केतन भटाटे यांना स्वयंपाक करण्यासाठी स्वतःचा गॅस नसल्याने त्यांना अन्य लोकांवर अवलंबून राहावे लागत होते. याबाबत इगतपुरीचे वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांना इगतपुरीनामाचे मुख्य संपादक भास्कर सोनवणे यांनी माहिती दिली. त्यांनी इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार सर्व सहकाऱ्यांनी सामाजिक दातृत्व दाखवण्यासाठी सहयोग देण्याचा निर्णय घेतला. आज जागतिक महिला दिन आणि इगतपुरीनामा न्यूज पोर्टलचा पहिला वर्धापनदिनाचे औचित्य साधून अंध दिव्यांग महिलेला एचपी गॅसचे कनेक्शन देण्यात आले. यावेळी लेखापाल राजेंद्र देशमुख, खैरगावचे वन परिमंडळ अधिकारी पोपट डांगे, वनरक्षक गौरव गांगुर्डे, विठ्ठल गावंडे, फैजअली सैय्यद, राहुल घाटेसाव, मुज्जू शेख आदी उपस्थित होते. ह्या बहुमोल कामासाठी हिंदुस्थान बिझ एचपी गॅस घोटीचे संचालक प्रवीण नागरे, विपुल करंजकर, व्यवस्थापक शारदा शिदे, रऊफ खान यांचे साहाय्य लाभले.