प्रभाकर आवारी इगतपुरीनामा न्यूज : मुकणे धरणाच्या कावनई भागात शुक्रवारी दुपारी ४ वाजे दरम्यान चक्रीवादळासह झालेल्या पावसाने पोल्ट्रीचे पत्रे उडून त्यातील २५०च्या आसपास कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मिनीनाथ गुळवे यांच्या पोल्ट्रीफार्ममध्ये अंदाजे १ ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चक्रीवादळच्या तीव्रतेने धरणातील पाणी पावसाप्रमाणे हवेत उडतांना दिसत होते. आहे. धरणाच्या दिशेने चक्रीवादळ तयार […]
इगतपुरीनामा न्यूज – गुरुवारी अनंत चतुर्दशीला गणेश भक्तांनी वालदेवी धरणावर गणेश विसर्जनास जाऊ नये. यासाठी कोणीही गर्दी करू नये असे आवाहन वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याअंतर्गत पिंपळद हद्दीत वालदेवी धरणावर गणेश विसर्जन करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यास ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय झाला आहे. येथे यापूर्वी […]
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावर जव्हार फाट्याजवळ जुन्या कसारा घाटात झिरो पॉइंट भागात वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने एका कारने अचानक पेट घेतला. यावेळी कारचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करून तो बाहेर पडला. यामुळे कसारा घाटात बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र घोटी, इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन दल, टोल […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात ह्यावर्षी पावसाने लवकरच पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकासह, नागली, वरई, भुईमुग आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे शासनाने दखल घेऊन इगतपुरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्यांचे निवेदन इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, रामदास मालुंजकर यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे प्रांताधिकारी रवींद्र […]
इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी मोडाळे येथील मोहन गोऱ्हे यांचे मळ्यातील घर आगीने संपूर्ण भस्मसात झाले. मोहन गोऱ्हे, पत्नी कमल गोऱ्हे या शेतात कामानिमित्त तर मुले शाळेत असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गोऱ्हे कुटुंबांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. शॉर्टसर्किटमुळे घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडे सर्वच जळून खाक झाल्याने गोऱ्हे कुटुंबीय सध्या रस्त्यावर आले आहे. या पीडित […]
दीपाली जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – तो अवघा दीड वर्षांचा…दिवसभर खेळून दमलेल्या या चिमुकल्यास रात्री अचानक मण्यार या विषारी सापाने दंश केला. कोवळ्या जीवावर जहाल सापाचा हल्ला असल्याने चोवीस तास त्या कोवळ्या जीवाची मृत्यूशी झुंज सुरू होती. एकीकडे डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न तर दुसरीकडे कुटुंबाने केलेला देवाचा धावा कामी आला, अन त्या कोवळ्या जिवाने मृत्यूशी लढाई […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – काय तो पायवाटेचा निसरडा रस्ता… काय तो निसर्ग… काय ती डोंगरं आणि दऱ्या…. मोठमोठे खाचखळगे, दगडं, चिक्खल…अन ओढे, नाले, जंगल असा ३ ते ४ किलोमीटरचा थरारक पायी प्रवास करीत नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम खैरेवाडी येथे भेट दिली. जिल्हाधिकारी यांच्यासह सोबत असणाऱ्या सर्वच शासकीय अधिकाऱ्यांना खैरेवाडीचा […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील प्राचीन गाव असणाऱ्या कावनई येथील किल्ल्यावरून दगडी दरड खाली कोसळली. पोकळ झालेल्या भुभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आली. सुदैवाने कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नसली गावकऱ्यांनी सावध राहावे असा इशारा देण्यात आला आहे. किल्ल्याच्या खालच्या भागात चार पाच कुटुंबाची छोटेखानी घरे असून दैव बलवत्तर म्हणून त्यांच्यापर्यंत दरड आली नाही. सध्या […]
इगतपुरीनामा न्यूज – इमर्जन्सी अलर्ट सिस्टम ह्या राष्ट्रीय सार्वजनिक चेतावणी प्रणाली अंतर्गत दुरसंचार विभागाद्वारे आज सकाळी १० वाजेपासून अनेक मोबाईलवर सिक्युरिटी अलर्टचा टेस्ट मेसेज धडकला. मोबाईल वापरत असतानाच्या अनेक वर्षांपासून पहिल्यांदा असा मेसेज आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. मात्र यामुळे घाबरून जाऊ नये, हा आपत्कालीन व्यवस्थापन करतांना करण्यात आलेला टेस्ट मेसेज आहे. राज्य आणि स्थानिक अधिकारी […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी जीर्ण झालेले विद्युत पोल आणि लोंबकळणाऱ्या तारा जीवघेण्या ठरत आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. जीर्ण झालेले पोल व वितरण व्यवस्था बदलण्याची गरज असून अधिकारी फक्त टोलवाटोलवी करत असल्याची सध्या परिस्थिती आहे. मंडळाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष […]