
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने येत असताना महिंद्रा XUV कार क्रमांक MH 04 HF 3641 पेट घेतल्याची घटना घडली आहे. जुन्या कसारा घाटात घाट चढून आल्यावर टोप बारव जवळ ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करत सर्वांना बाहेर काढले. यामुळे जीवितहानी टळली. जुना कसारा घाट एक तासापासुन खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. नवीन कसारा घाटातून वाहतून वळविण्यात आली आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग टीम, इगतपुरी नगर परिषदेचे अग्निशमन दल, टोल नाक्याचे अग्निशमन दल, महिंद्रा अँड महिंद्राचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यात बऱ्यापैकी यश आले आहे.