५ दिवसातच इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्याकडून अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला मिळाली ३७ हजार ५०० नुकसानभरपाई : सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज – मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे घोटी खुर्द येथील शंकर यशवंत निसरड यांचे घर कोसळले होते. या घटनेत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि एका म्हशीचा मृत्यू झाला होता. इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन तलाठी, मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज शंकर यशवंत निसरड ह्या पीडित शेतकऱ्याला ३७ हजार ५०० रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. आज सुट्टीचा दिवस असूनही तहसीलदार अभिजित बारवकर, मंडळ अधिकारी सुयोग वाघमारे, तलाठी मनोज मोरे यांनी घोटी खुर्द येथील राहत्या घरी जाऊन दिला. सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी घटना घडल्यापासून मदत मिळेपर्यंत यशस्वी पाठपुरावा केला. पीडित शेतकरी शंकर निसरड यांनी महसूल अधिकारी आणि आत्माराम फोकणे यांचे आभार मानले आहेत. यावेळी पीडित शेतकरी शंकर यशवंत निसरड यांची पत्नी सिंधूबाई शंकर निसरड,सामजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे, घोटी खुर्दचे पोलीस पाटील कैलास फोकणे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रोंगटे, रामचंद्र रोंगटे, उद्धव रोंगटे आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!