
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथील खंडू पांडू साबळे यांच्या राहत्या घराला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कुटुंबातील सर्वजण बाहेर असल्याने जीवित हानी टळली. मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच कापणी करून काढलेले भात आणि बी बियाणे आगीच्या भक्षस्थानी पडले. आगीमुळे ह्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील स्थानिक युवकांनी गावातील पाणीची टाकी व बादल्यांमध्ये पाणी आणून आग आटोक्यात आणायचा प्रयत्न सुरू केला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून घोटी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. आग कशामुळे लागली याचा पोलीस तपास करत आहेत