“एल्गार” आणि पालकांच्या दणक्यामुळे मुख्याध्यापकाला बनवले पिंप्री उर्दू शाळेतील पर्यायी शिक्षक : गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी आणि शिक्षकांत समन्वय नसल्याने नाराजी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पहिली ते सहावीच्या वर्गासाठी एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आज आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबत लक्ष घातले होते. चालढकल आणि दिशाभूल […]

६ वर्गाला एकच शिक्षक ; शिक्षक मिळण्यासाठी शेळ्या घेऊन विद्यार्थी इगतपुरीत धडकणार : शिक्षक न मिळाल्यास शेळ्या वळण्याची परवानगी द्या : एल्गार कष्टकरी संघटनेचा आंदोलनाला पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो, ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये पहिली ते सहावीच्या वर्गासाठी एकमेव शिक्षक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या सहा वर्गांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आल्यामुळे पालकांनी इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे वारंवार प्रयत्न करूनही शिक्षक उपलब्ध होत नाही. ह्यामुळे येथील […]

समृद्धीमुळे पेरू बागेचे ४५ लाखांचे नुकसान ; भरपाई देण्यास टाळाटाळ : बाधित शेतकरी काशिनाथ शिंदे यांचा १० एप्रिलला आत्मदहनाचा इशारा

  इगतपुरीनामा न्यूज – समृद्धी महामार्गाच्या कामामुळे एक हेक्टर पेरू बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न करुनही समृद्धी महामार्गाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. भरपाई न देता फसवणूक करून अन्याय करीत आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील पीडित शेतकरी काशिनाथ वाळू शिंदे यांनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला […]

समृद्धीचा ‘भरवीर‌ ते नांदगाव सदो’ टप्पा कार्यान्वित करण्यापुर्वी प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय दूर करा : आमदार हिरामण खोसकर यांची पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात इगतपुरी तालुक्यातुन गेलेल्या समृद्धी महामार्गामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमीनी संपादित झालेल्या आहेत. त्या सर्वांच्या विविध समस्या अद्यापही सुटलेल्या नसून समस्या जैसे थे आहेत. काही शेतकऱ्यांच्या महामार्गाच्या दोन्ही बाजुने शेतजमीनी असुन त्यांचे पूर्वापार वहिवाट रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी अरुंद व छोटे अंडरपास घेतल्याने शेतीमाल […]

९ लाखांच्या अपहारप्रकरणी उद्या इगतपुरी पंचायत समिती समोर उपोषण : पिंपळगाव मोर ग्रामपंचायत सदस्या सुमन गातवे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – पिंपळगाव मोर येथील ग्रामसभा कोषनिधी ( पेसा ) समितीने बँक खात्यातुन ९ लाखांचा अपहार केला म्हणून गतवर्षी मे महिन्यात सरपंचांनी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना कळवले होते. पंचायत समितीने याबाबत कायदेशीर कारवाई न केल्याने ग्रामपंचायत सदस्या सुमन युवराज गातवे ह्यांनी सप्टेंबरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. पंचायत समितीने आठ दिवसात गुन्हा […]

‘दारणा’ दुषित होणार असल्याने नव्या औद्योगिक वसाहतीला शिवशाही संघटनेचा विरोध

इगतपुरीनामा न्यूज – आडवण, पारदेवी येथील होणाऱ्या एमआयडीसीमुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. शेतकऱ्यांकडे उपजिवीकेचा पर्याय राहणार नाही. यासह स्वच्छ असणाऱ्या दारणा नदीत कारखान्यातील रासायनिक व दुषित पाणी जाणार आहे. म्हणुन या प्रकल्पाला शिवशाही संघटनेचा विरोध आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रोहीत उगले दारणा काठावर वसलेल्या गावागावात जाऊन जनआंदोलन करून जनजागृती करणार आहेत. दारणेचा उगम बहुतांशी […]

शिरसाठे जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करा : लोकनियुक्त सरपंच सुनीता सदगीर

इगतपुरीनामा न्यूज – शासनाने कोट्यवधीचा निधी पाण्यासाठी दिला असूनही स्थानिक प्रशासनाकडून हा निधी लाटण्यात येत आहे. खोदलेल्या विहिरीत थेंबभरही पाणी नसल्याने ही योजना आपल्या ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायतीचा सपशेल नकार आहे. हा प्रकार इगतपुरी तालुक्यातील शिरसाठेमध्ये घडला आहे. गावाकडे २ वर्षांपूर्वी जलजीवन अंतर्गत दीड कोटीचा निधी प्राप्त आहे. मात्र पाईप किंवा कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. खोदलेल्या […]

पाडळी देशमुखला अडीच महिन्यांपासून ग्रामसेवक नाही : ग्रामसेवक नेमणूक न झाल्यास १ जानेवारीला उपोषण – सरपंच खंडेराव धांडे

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज : पाडळी देशमुख, ता. इगतपुरी येथे गेल्या अडीच माहिन्यांपासून ग्रामसेवक कोण आहे हा प्रश्न दस्तुरखुद्द लोकनियुक्त सरपंच खंडेराव धांडे व उपसरपंच आणि सर्व सदस्यांना पडला आहे. महामार्गाजवळ असणाऱ्या पाडळी देशमुख गावची अशी अवस्था असेल तर दुर्गम भागातील गावांची काय अवस्था असणार असा प्रश्न पडला असुन याप्रकरणी उपोषण करणार असल्याचा इशारा […]

मुंढेगाव प्रकरणी २२ ज्ञात आणि ५० अज्ञात संशयितांच्या विरोधात घोटी पोलिसांत गुन्हा दाखल : राष्ट्रीय महामार्ग अडवून सरकारी कामात अडथळा आणल्याचे प्रकरण

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील अविनाश कैलास गतीर ह्या युवकाचा २ डिसेंबरला अपघाती मृत्यू झाला होता. त्या अपघातात मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना १० लाख रुपये तात्काळ मदत मिळावी या कारणास्तव मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. या प्रकरणी घोटी पोलिसांनी २२ ज्ञात व इतर ४० ते ५० अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल […]

मुंबई आग्रा महामार्ग अजून किती लोकांचे बळी घेणार ? मुंढेगावच्या अपघाताने आक्रमक आंदोलनाचे सत्र वाढणार ?

भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर अपघातांचे विविध केंद्रबिंदू तयार होत आहेत. रोजच कुठे ना कुठे अपघातांची घटना घडत आहे. यामुळे लोकांचे बळी जाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कायमचे आणि तात्पुरते अपंगत्व आणि भीषण सामाजिक प्रश्न सुद्धा यानिमित्ताने उद्भवत आहेत. दुर्दैवाने घोटी आणि पिंपळगाव बसवंत टोलनाका प्रशासनाला यांचे काहीही सोयरसुतक नाही. […]

error: Content is protected !!