२०२४ मध्ये जगद्‌गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचे भरवस येथे आयोजन : नाशिक जिल्ह्यातील पहिल्याच भव्य कार्यक्रमाचे नियोजन सुरु

चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – श्री तुकाराम बीज हा दिवस संत तुकोबारायांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांनी वैकुंठगमन केले. त्यांस २०२४ -२५ दरम्यान ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे २ ते ८ एप्रिल २०२४ या कालावधीत जगद्‌गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा रंगणार आहे. यासंबंधीची […]

उभाडे येथे उद्यापासून हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा : तीन दिवस होणार विविध धार्मिक कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे उद्या  मंगळवारी ६ तारखेपासून मठाधिपती माधव बाबा घुले यांच्या आशीर्वादाने तसेच इगतपुरी जोग महाराज भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्यभिषेक दिनाच्या मुहूर्तावर असलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देवळे सोसायटीचव व्हॉइस चेअरमन योगेश्वर सुरुडे, समाधान सुरुडे, […]

संतश्रेष्ठ तुकोबांच्या गाथा वाचनाने चारी वेदांचे पारायण होऊन अमृतवर्षाव – डॉ. रामकृष्णदास लहवितकर : धामणगाव येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ

इगतपुरीनामा न्यूज – चांगल्या कामाला नेहमीच महापुरुषांचे आशीर्वाद लागतात. मठाधिपती गुरुवर्य माधव बाबांच्या प्रेरणेने धामणगावच्या ग्रामस्थांनी एकोप्यातून उभारलेल्या मंदिराची निर्मिती अतिशय सूंदर केली आहे. कळस बसल्यावर धामणगाव म्हणजे प्रति पंढरपूरच होईल असे प्रतिपादन जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी केले. श्रीक्षेत्र धामणगाव येथे मंगळवारपासून मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांच्या आशीर्वादाने हनुमान मंदिर जीर्णोद्धार […]

परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कीर्तन प्रवचन – हभप प. पु. महंत अचलपूरकर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – परमेश्वराकडे  जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कीर्तन प्रवचन असुन यामुळे मोक्षाची प्राप्ती होते.  सकलांचा उद्धार झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे मंथन आहे.  अनंत जीवनात जीवाला फेरे पडले. कीर्तनात खूप मोठी ताकद लपली आहे. पारमार्थिक कार्य करणारा माणूस जगाला आवडत नाही फक्त भगवंताला आवडतो. प्रत्येकाने अहंकार बाजूला केल्यास परमेश्वराची नक्कीच प्राप्ती होईल असे […]

वारकऱ्यांचे लाडके वै. शत्रुघ्न महाराज गतीर – इगतपुरी तालुक्यातील अनमोल रत्न पांडुरंगचरणी विलीन

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा पवित्र ते कुळ पावन तो देशजेथे हरिचे दास जन्म घेतीअसे सर्वच संतांचे सिद्ध झालेले प्रमाण आहे. ह्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका सुद्धा मागे नाही. ह्या तालुक्यात विविध रत्नांची खाण आहे. ह्यापैकी अत्यंत महत्वाचे अनमोल असणारे एक रत्न हभप शत्रुघ्न महाराज महादु गतीर हे १ एप्रिल २०२३ ला वैकुंठवासी झाले. […]

बंद हरिनाम सप्ताह सुरू करण्यासाठी आवश्यक सहाय्य करणार : गोकुळ महाराज पुंडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – अनेक गावांत वारकरी सांप्रदायिक नामजप यज्ञ असणारे अखंड हरिनाम सप्ताह गावांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बंद पडत आहेत. वारकरी सांप्रदायाची पताका मजबूत करून हरिनामाचा जागर करण्यासाठी ह्या सप्ताहांचे मोठे योगदान आहे. बंद असणारे सप्ताह सुरू करण्यासाठी आर्थिक घडी बिघडलेल्या गावांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप […]

इगतपुरी तालुक्याची पहिली महिला कीर्तनकार “कु. पौर्णिमा” : खडकवाडीतील संस्कारांचे मोती भाविकांच्या सेवेत

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज “ओलें मूळ भेदी खडकाचें अंग | अभ्यासासी संग कार्यसिध्दी” ह्या अभंगाद्वारे असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करतात. त्या अभंगाचा सारांश असा आहे की,  दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. विष पचायला अत्यंत कठीण असते पण हेच विष सातत्याने थोडे थोडे […]

सिद्धिविनायक महागणपती प्रतिष्ठानच्यावतीने पाडळी देशमुख येेथे उद्या विविध कार्यक्रम : माघी गणेश जयंतीनिमित्त होणार भरगच्च सोहळा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४- मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी फाट्यापासून जवळच असणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सालाबादप्रमाणे यावर्षी गणेशजयंतीनिमित्त उद्या बुधवारी जानेवारीला गणेश जयंती उत्सव सोहळा आणि यात्रा महोत्सव होणार आहे. सिद्धिविनायक महागणपती प्रतिष्ठानचे विश्वस्त संजय तुपसाखरे यांनी याबाबत माहिती दिली. उद्या पहाटे ६ वाजेपासून महागणेश याग, महायज्ञ व महापुजा, दुपारी १ वाजता […]

इगतपुरी तालुक्यातील ३५० साधकांचा अयोध्या, प्रयागराज, गया, नैमिषारण्य, काशी आणि चित्रकुट येथे भव्य सत्संग सोहळा संपन्न : एकनाथ बाबा चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने फुलला भक्तीचा मळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – गुरुवर्य हभप एकनाथ बाबा चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने इगतपुरी तालुक्यातील ३५० साधकांचा सत्संग सोहळा श्रीक्षेत्र नैमिषारण्य, श्री क्षेत्र अयोध्या, श्री क्षेत्र प्रयागराज, श्री क्षेत्र चित्रकुट, श्री क्षेत्र काशी, श्रीक्षेत्र गया या पवित्र पुण्यभुमीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील नामवंत प्रवचन कीर्तनकारांनी आपल्या अमृत वाणीतुन समाज प्रबोधन केले. हभप चंदर महाराज […]

शंभरीकडे वाटचाल करणारे तळोशीचे हभप सावळीराम बाबा : विठ्ठल भक्ती, सेवेची शक्ती आणि आहाराची युक्ती ह्या त्रिसूत्रीमुळे शताब्दीकडे वाटचाल

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – शरीर उत्तम चांगले.. शरीर सुखाचे घोसूले.. शरीरे साध्य होय केले.. शरीरे साधीले परब्रम्ह.. ह्या संतवचनाप्रमाणे अवघे आयुष्य परमार्थ करण्यासाठी देणारे विरळे.. युक्त आहार विहार आणि परमेश्वराचे नामस्मरण करता करता आपल्या विचारांचा वारसा भक्कमपणे सुरु ठेवणारे तर दुर्मिळच.. असेच तरुणांनाही लाजवेल असे ९४ वर्षीय व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्यातील तळोशी […]

error: Content is protected !!