श्री गुरुदेव – स्व स्वरूप संप्रदाय इगतपुरी तालुक्यातर्फे इगतपुरी ते कावनई पायी पालखी सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रावण मास‌ निमित्ताने आणि २७, २८ ऑगस्टला नियोजित असलेल्या समस्या मार्गदर्शन कार्यक्रमा निमित्ताने स्व स्वरूप संप्रदाय इगतपुरी तालुक्यातर्फे इगतपुरी ते श्री क्षेत्र कावनई पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ८०० ते ९९० भाविक महिला आणि पुरुषांनी ह्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद घेतला. डोक्यावर मंगल कलश आणि तुळशी वृंदावन घेऊन महिला भाविकांनी सहभाग घेतला. नामस्मरण, भजन करीत हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संग्राम सेना, महिला सेना, युवा सेना, तालुका कमिटी यांनी मोलाचे सहकार्य केले अशी माहिती स्वरूप संप्रदाय इगतपुरी तालुका पालकमंत्री राजेंद्र उदावंत यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!