परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कीर्तन प्रवचन – हभप प. पु. महंत अचलपूरकर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – परमेश्वराकडे  जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कीर्तन प्रवचन असुन यामुळे मोक्षाची प्राप्ती होते.  सकलांचा उद्धार झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे मंथन आहे.  अनंत जीवनात जीवाला फेरे पडले. कीर्तनात खूप मोठी ताकद लपली आहे. पारमार्थिक कार्य करणारा माणूस जगाला आवडत नाही फक्त भगवंताला आवडतो. प्रत्येकाने अहंकार बाजूला केल्यास परमेश्वराची नक्कीच प्राप्ती होईल असे महत्वपूर्ण निरुपण परम पूज्य महंत अचलपूरकर बाबा ( पळसे ) यांनी केले. जानोरी येथे मठाधिपती माधव बाबा घुले यांच्या आशीर्वादाने हभप अशोक महाराज धांडे यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आजच्या किर्तनरुपी सेवेत  पाचवे पुष्प गुंफताना परमपूज्य अचलपूरकर बाबा बोलत होते.

जगात भगवदगीते सारखा मोठा ग्रंथ नाही. परमेश्वराची विभूती कळायला हवी. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी अखंड चिंतन करावे. यावेळी संत निळोबाराय महाराजांचे प्रमाण देऊन त्यांनी गुरू शिष्याची परंपरा सांगितली. चक्रधर स्वामी यांच्या शिकवणी बाबत माहिती विशद केली. अंधश्रद्धेचे होळी करायला हवी तसेच नम्रता हा खरा श्रेष्ठ दागिना असून तो  प्रत्येकाने स्वीकारावा असेही ते शेवटी म्हणाले. हभप अशोक महाराज धांडे, जगदीश महाराज जोशी यांची किर्तनरुपी सेवा होणार आहे. १३ एप्रिल रोजी हभप बाळासाहेब महाराज गतीर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. गायक किरण महाराज लोहकरे, गोरख महाराज गतीर यांचे सुमधुर गायन होत आहे. तर जानोरीचे पखवाजवादक गणेश भोर यांची यांचे योगदान सहकार्य आहे.

Similar Posts

error: Content is protected !!