इगतपुरी येथे अधिक मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाला प्रारंभ

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठात मठाधिपती हभप गुरुवर्य तपोनिधी माधवबाबा घुले यांच्या आशीर्वादाने अधिकमास तथा पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सवात  प्रारंभ झाला. यात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्रीमद्भभागवत कथा प्रवक्ते हभप जगदीश महाराज जोशी यांची दररोज दुपारी २ ते ५ या दरम्यान कथासेवा होणार आहे. पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरीपारायण, श्रीमद्भागवत कथा, हरिपाठ, भजने, कीर्तने आणि भक्तिमय वातावरणात हरिनामाचा गजर होणार आहे.
कीर्तनरुपी सेवा ६ ऑगस्ट रोजी हभप अशोक महाराज धांडे, दिनांक ७ रोजी हभप बाळासाहेब महाराज बिन्नर, दिनांक ८ रोजी माधव महाराज राठी, दिनांक ९ हभप बाळासाहेब महाराज गतीर, दिनांक १० रोजी हभप जयंत महाराज गोसावी, दिनांक ११ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज कदम ( छोटी माऊली ), दिनांक १२ हभप गुरुवर्य मठाधिपती माधव बाबा घुले, दिनांक १३ रोजी हभप जगदीश महाराज जोशी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान कीर्तन कार्यक्रम होणार आहे. उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन व मुक्कामी येणाऱ्या भाविकांसाठी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा हरिनाम सुखसोहळा पाहण्यासाठी भक्तिमय वातावरणात आनंद घेण्यासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जोग महाराज मठ इगतपुरी यांच्याकडून करण्यात आली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!