– माधुरी संजय पैठणकर, पाथर्डी
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजः पुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि
लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. गावच्या ठिकाणी अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. खास प्रसंगी आणि सणवाराला आपल्याकडे रांगोळी काढणे पवित्र आणि शुभ मानले जाते. आज आषाढी एकादशी साजरी करत आहोत. या मंगलदिनी दारासमोर रांगोळी काढली जाईल. ज्या महिलांना रांगोळी काढण्याची आवड आहे, अशा महिलांसाठी आम्ही खास आषाढी एकादशी निमित्त सोप्या विठ्ठल रांगोळी डिझाईन्स दाखवत आहोत. ह्या रांगोळ्या माधुरी संजय पैठणकर यांनी काढलेल्या आहेत.