गर्दीचे सर्व उच्चांक मोडून इगतपुरीच्या कानिफनाथ मठात ५० हजारापेक्षा जास्त भाविकांकडून दत्तजन्मोत्सव साजरा : गुरुवर्य सावळीराम महाराज आयोजित उत्सवात विविध कार्यक्रमांची भाविकांना मेजवानी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – गुरुदेव गुरुदत महाराज जन्मोत्सवाच्या आनंदी पर्वावर महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी इगतपुरी येथील कानिफनाथ महाराज मठात हजेरी लावली. मागील आठवड्यापासून सुरु झालेला सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिमाखात संपन्न करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद भाविकांना मिळाला. आज सकाळपासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..कानिफनाथ […]

संतस्वरूप सज्जन व्यक्तिमत्वे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरचे दिपस्तंभ आणि कल्पतरू ; स्व. कारभारी ( दादा ) गिते यांच्यासारख्यांचे नाव घेतले तरी पुण्य : हभप उद्धव महाराज चोले यांचे कीर्तनात सुंदर निरूपण

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 संतस्वरूप सज्जन व्यक्तिमत्वे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरचे दिपस्तंभ आणि कल्पतरू आहेत. निरामय, निरपेक्ष स्नेह देणारे कारभारी दादांसारखे सज्जन व्यक्तिमत्व सर्वांना प्रगतीची वाटचाल करायला शिकवतात. लोकांच्या हृदयात असलेल्या पांडुरंगाशी एकरूप होऊन मनापासून सेवेचे पुण्यकर्म करतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी चांगले कर्म करून संतस्वरूप कार्याचा आलेख उभा केला असे कारभारी ( दादा ) गिते हे […]

सुसंस्कारांची पेरणी करणाऱ्या ८० बाल वारकऱ्यांना वारकरी वेशभूषा साहित्याचे वाटप : तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ वारकरी परंपरेची कास धरून सन्मार्ग आणि संतांच्या विचारांची सांगड घालण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील बाल वारकऱ्यांचे कार्य सुरु आहे. भजन, कीर्तन, वादन, हरिपाठ, पारायण, वाचन आदी मार्गांनी परमेश्वराची सेवा हे बाल वारकरी करीत असतात. त्यांच्या कार्यामुळे समाजामध्ये सुसंस्कारांचे बीज पेरले जाते. ह्या बाल वारकऱ्यांना इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते […]

इगतपुरी तालुक्यातील प्रति पंढरपूर माणिकखांब येथे आषाढीनिमित्त वारकऱ्यांची गर्दी : रामकृष्णहरी नामघोषाने दुमदुमला परिसर ; विविध धार्मिक कार्यक्रम अखंड सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० रुप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी आणि पांडुरंगाच्या महिमा वर्णन करणाऱ्या विविध अभंगांचा निनाद, टाळांचा खणखणाट, पखवाज आणि हार्मोनियमची साथ सांगत ह्यांचा मेळ साधून माणिकखांब येथील विठुरायाच्या मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम सुरु आहेत. पहाटेपासून इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. अनेक अडचणींमुळे प्रत्यक्षात […]

१५ वर्षांपासून वारकरी पताका खांद्यावर घेऊन आषाढी वारी करणारे उत्तमराव झनकर : आळंदी ते पंढरपूर दिंडीत सहभाग घेऊन घेतात वारीचा आनंद

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ भेटी लागे जिवा लागलीसे आस”  या अभंगाप्रमाणे विटेवर उभ्या असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची आस आषाढी एकादशीच्या निमित्ताने सदैव वारकऱ्यांना नेहमीच लागलेली आहे. या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील वारकरी संप्रदायाची पताका हाती घेतलेले माजी सरपंच उत्तमराव झनकर ओळखले जातात. ते गेल्या १५ वर्षांपासून त्यांची पत्नी सौ. रंजना […]

माऊलींच्या समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळ्याला जाणार इगतपुरी तालुक्यातील हजारो भाविकांची मांदियाळी : १७ आणि १८ तारखेच्या नाशिकला होणाऱ्या कार्यक्रमाची भक्तांना उत्सुकता

भाविकांनी लाभ घेण्याचे तालुका सेवा समितीचे आवाहन भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या विचारांवर इगतपुरी तालुक्यातील हजारो भाविक अढळ निष्ठा ठेवतात. महाराष्ट्रात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये आपल्याला सोपवलेल्या जबाबदारीची सेवा सुद्धा अनेक सेवेकरी नियमित करीत असतात. यासह गावोगावी आपल्या आदरणीय माऊलींचे प्रेरणादायी विचार […]

प्रति पंढरपूर त्र्यंबकेश्वर येथे हरिनामाचा जयघोष : श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाची उटी

 सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ “धन्य धन्य निवृत्ती नाथा” !”काय महिमा वर्णावा आता” !”शिवावतार धरुनी आले ,”।”केले त्रिलोकी पावन”।”समाधी त्र्यंबकशिखरी”।”मागे शोभे ब्रम्हगिरी”। हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रति पंढरपूर असलेले  श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मुर्तींना सुगंधी चंदनाची उटी […]

अखेरच्या श्वासापर्यंत संस्कार, अध्यात्म आणि जनसेवा करणारे देवतुल्य व्यक्तिमत्व स्व. रामभाऊ बाबा आघाण

लेखन – हभप जालिंदर महाराज रेरे, कीर्तनकार, खैरगावदेविदास भगवंता हिंदोळे, प्राथ. शिक्षक पिंपळगाव भटाटा ज्या मातीमध्ये जन्म घेऊन जगणे शिकलो ती पावन माती, जन्म देणारी माता आणि आपला समाज ह्या त्रिसूत्रीला विसरू नये. कृतज्ञतेची कास धरून जनतेच्या हृदयातील परम परमात्मा पांडुरंग परमेश्वर प्रसन्न होईल असे नित्य कार्य करीत राहावे. अशा प्रकारची शेकडो नीतिमूल्ये ज्यांच्या धमन्यांमध्ये […]

“जय श्रीराम” घोषणांनी इगतपुरी तालुका निनादला : श्रीरामजन्मोत्सवानिमित्त श्री प्रभू रामचंद्र रथयात्रेद्वारे १० गावांना प्रदक्षिणा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० इगतपुरी तालुका म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे. प्रभू रामाच्या विविध पाऊलखुणा तालुक्यातील विविध भागात आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीरामनवमीनिमित्त प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांची अलोट गर्दी झाली. राम मंदिरांमध्ये पहाटे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार […]

लोहशिंगवे येथे २ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे शनिवारी २ एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज यांच्या शुभप्रेरणेने व मार्गदर्शनाखाली  अखंड हरिनाम सप्ताह होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. विठू नामाच्या जयघोषाने सुरू होणाऱ्या सप्ताहात कृष्णा महाराज कमानकर, सागर महाराज दिंडे, सुनील महाराज […]

error: Content is protected !!