इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे उद्या मंगळवारी ६ तारखेपासून मठाधिपती माधव बाबा घुले यांच्या आशीर्वादाने तसेच इगतपुरी जोग महाराज भजनी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्यभिषेक दिनाच्या मुहूर्तावर असलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन देवळे सोसायटीचव व्हॉइस चेअरमन योगेश्वर सुरुडे, समाधान सुरुडे, माजी सरपंच जगन उंबरे, सरपंच संतोष पदमेरे, स्वराज्य घोटी गटप्रमुख बाळू दामू सुरुडे यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मित्र मंडळ, अंबिका मित्र मंडळ, सिद्धार्थ तरुण मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थाचे यांचे सहकार्य लाभत आहे.
मंगळवारी रात्री ६ ते ८ वाजता हभप देवराम महाराज गायकवाड, बुधवारी उमेश महाराज दशरथे, गुरुवारी माधव बाबा घुले यांचे कीर्तन होईल. तीन दिवस होणाऱ्या कार्यक्रमात रोज पाच ते सहा हरिपाठ, सहा ते आठ कीर्तनानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. ध्वजारोहण, गणपती पूजन, जलपूजन, अग्नी स्थापना, धान्य निवास अशा विविध पूजा होणार आहेत. गुरुवारी ८ तारखेला कलश स्थापना उतरंग हवन, बलिदान पूर्णाहुती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी मठाधिपती माधव महाराज घुले यांच्या हस्ते कलशारोहन कार्यक्रम होणार असून मंदिरात गणपती, शिवलिंग, हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. कार्यक्रसाठी तालुक्यातील गायक, वादक, भजनी मंडळाने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थांनी केले आहे.