इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येकाने श्रेष्ठांच्या परंपरेने चालले पाहिजे. दयानिधी संत मार्ग दाखवून गेले असून त्याच मार्गाने आपल्याला जायचे आहे. जीर्णोद्धार केल्याने पुण्य प्राप्त होते. ध्यान भक्ती करण्यासाठी चांगली मूर्ती आवश्यक असून उपासना करणे गावाचे परम कर्तव्य आहे असे निरुपण मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांनी केले. उभाडे येथील हनुमान जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मठाधिपती माधव महाराज घुले यांच्या हस्ते कलशारोहन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी किर्तन सेवेत ते बोलत होते. परमेश्वराची जो भक्ती करतो त्याची मनोकामना पूर्ण होते. शिव नामाचा उच्चार केल्याने कल्याण होत असल्याचे सांगत वैदिक पूजेचे महत्व त्यांनी सांगितले. प्रत्येकावर वयाच्या आठव्या वर्षी संस्कार झाले पाहिजे असे माधव महाराज यांनी सांगितले. ध्वजारोहन, गणपती पूजन, जलपूजन, अग्नी स्थापना, धान्यनिवास अशा विविध पूजा झाल्या. कलश स्थापना उतरंग हवन, बलिदान पूर्णाहुती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा आदी पूजा करण्यात आल्या.
याप्रसंगी देवळे सोसायटीचे व्हॉइस चेअरमन योगेश्वर सुरुडे, संचालक समाधान सुरुडे, माजी सरपंच जगन उंबरे, सरपंच संतोष पदमेरे, स्वराज्य घोटी गटप्रमुख बाळू दामू सुरुडे, अशोक सुरुडे, तानाजी सुरुडे, पांडुरंग शेळके, मिलिंद भालेराव, मोरेश्वर गोसावी, किसन पदमेरे, तानाजी पदमेरे, देविदास सुरुडे, सुरेश भोर, विठ्ठल पदमेरे, रघुनाथ सुरुडे, राहुल शेळके आणि समस्त ग्रामस्थ हजर होते. माजी आमदार पांडुरंग गांगड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, संपत काळे, नंदू गाढवे, कैलास गोणके, नारायण भोसले, गौतम भोसले, नामदेव शिंदे, सागर गावंडे, उत्तम शिंदे, जनार्दन गोणके, त्र्यंबक गोलवड, विजू सिंग परदेशी, बंडु सुरुडे, महादू पदमेरे, गजीराम शिंदे, कचरू शिंदे, दीपक शेळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिवप्रेमी मित्र मंडळ, अंबिका मित्र मंडळ, सिद्धार्थ तरुण मित्र मंडळ, भजनी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.