अवकाळीने तालुका झोडपला, पंचनामे अकरा गावचेच का ? : इंदिरा काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या दोन महिन्यापासून कंबरडे मोडले असुन सोमवारी वादळी वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामूळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन भाजीपाल्यासह पोलिओ हाऊस, शेडनेट केलेल्या शेती नेस्तनाबूत झाल्या आहेत. म्हणून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव भास्कर गुंजाळ, […]

अवकाळीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या : इगतपुरी तालुका मनसेचे तहसीलदारांना निवेदन 

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी सायंकाळच्या सुमारास साकुर, साकुर फाटा, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, तातळेवाडी, […]

“स्वराज्य” जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांच्या नेतृत्वाखाली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी : बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – स्वराज्यप्रमुख संभाजी राजे छत्रपती यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी हजर होते. बळीराजाची परिस्थिती अतिशय वाईट झालेली असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. स्वराज्यच्या मावळ्यांनी आज तालुक्यातील सर्व […]

नांदगाव बुद्रुक, साकुर परिसरात अवकाळी नुकसानग्रस्त भागात आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पाहणी : नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – इगतपुरीच्या पूर्व भागातील नांदगाव बुद्रुक, साकुर भागात रविवारी झालेल्या जोरदार गारांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बागायती पिकांसह, ऊस, गहू, कांदा, मका, पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. याबाबत माहिती कळताच इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी […]

पिकविम्यासह शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या : कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ –इगतपुरी तालुक्यातील मुख्य भाताचे अवकाळीने मोठे नुकसान झाले असून पीकविमा कंपनीने अद्यापही दखल घेतली नाही. विम्याचा लाभ व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांना केली आहे. काँग्रेस शिष्टमंडळाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. पालकमंत्री ना. भुसे यांनी योग्य […]

जिल्हा बँक थकबाकीदार शेतकऱ्यांची वसुली थांबवावी : शेतकरी संघटनेचे सहकारमंत्री अतुल सावे यांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 1 नाशिक जिल्हा शेतकरी व शेतकरी संघटना ( स्व. शरद जोशी प्रणीत ) जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे व जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्री अतुल सावे यांना जिल्हा बँक थकबाकीदार शेतकऱ्यांची वसुली या विषयाबाबत निवेदन देण्यात आले. नोटबंदी, कोरोना आणि सततच्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक […]

माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समजून घेतल्या व्यथा : इगतपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे शिवसेनेने दिले निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27 इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, खेड भैरव परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे भातपिकांसह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी धामणगाव गटात पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान डोळ्यात पाणी आणणारे असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, इगतपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांबाबत शासनदरबारी आवाज उठवावा […]

२ तासांच्या परतीच्या तुंबळ पावसामुळे इगतपुरीत घरांमध्ये शिरले गटारीचे पाणी : ढिसाळ कारभारामुळे शहराला तलावाचे स्वरूप

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 इगतपुरी शहराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. गेल्या 2 तासांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शहरातील अनेक भागात पाणी तुंबले आहे. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी सुरु असलेल्या पाईप लाईनच्या अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी खोदकामाच्या खड्डयात पाणी साचले आहे. पावसाळापूर्व नाले सफाई न केल्याने ह्याचा त्रास सर्वसामान्य इगतपुरीकर नागरिकांना होत आहे. यामुळे इगतपुरी नगरपरिषदेचा […]

नांदडगाव येथे स्मशानभूमी नसल्याने भर पावसाळ्यात मृतदेहांचे होतात हाल : प्रशासनाने लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव ह्या गावात अनेक वर्षांपासून स्मशानभूमी नाही. सांजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या या गावात उघड्यावर अंत्यसंस्कार होत असल्याने मृत व्यक्तीला धड अंतिम क्रियाकर्म सुद्धा नशिबी नसल्याचे दिसते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी स्मशानभूमी बांधकामासाठी पाठपुरावा करण्याची जुनी मागणी आहे. या गावात गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी स्मशानभूमी नाही. परिणामी गावात अनेक वर्षांपासून होणारे […]

पिंपळगाव मोर रस्ता, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कातकरी बांधवांच्या प्रश्नांवर खंडेराव झनकर यांनी विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांच्याशी साधला संवाद : टाकेद गटातील विविध महत्वाच्या विषयावर दखल घेणार असल्याचा मिळाला शब्द

इगतपुरीनामा न्यूज, दि. 10 इगतपुरी तालुक्यातील टाकेद जिल्हा परिषद गटातील विविध महत्वाच्या प्रश्नांवर शिवसेना राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खंडेराव शिवराम झनकर यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे यांनी संवाद साधला. टाकेद गटातील पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा हा अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता शासनाच्या हलगर्जीपणामुळे खड्यांसह शेवटची घटका मोजत आहे. ह्या भागातील नागरिक शासनाच्या […]

error: Content is protected !!