पाडळी फाट्यावरील भुयारी मार्गाची दुरुस्ती १५ दिवसांत होणार : खासदार हेमंत गोडसेंच्या मध्यस्थीने पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमलेंच्या उपोषणाची सांगता

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

नाशिक मुंबई महामार्गावरील पाडळी फाटा येथील भुयारी मार्गाची दुरुस्ती करून तो जाण्यायेण्यासाठी सुरळीत करून खुला करावा. आदी मागण्यांसाठी पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यासमवेत आज उपोषण सुरू केले होते. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या यशस्वी मध्यस्थीने व संबंधित राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या दुरुस्तीची लेखी हमी दिल्याने उपोषणकर्त्यांचे उपोषण पहिल्याच दिवशी सुटले.

पाडळी फाटा येथील महामार्गावर तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गातुन पाण्याचा निचरा होण्यासाठी सोयच नाही. येथे बारमाही पाणी साचुन राहत होते. तसेच महामार्गावर गतिरोधक, सुचना फलक व निवाराशेड उभारण्यात यावे या मागण्यांकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. यामुळे पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले, सरपंच खंडेराव धांडे, मुकणेचे माजी सरपंच विष्णु राव, विष्णु धोंगडे, तुकाराम वारघडे, रामभाऊ धोंगडे, सोमनाथ चारस्कर यांच्यासह शालेय विद्यार्थी आज इगतपुरी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.

यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी उपोषणस्थळी जाऊन सर्वांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी दिलीप पाटील यांना तेथे बोलाऊन संबंधित कामे मार्गी लावण्याच्या सूचना करीत धारेवर धरले. यावेळी दिलीप पाटील यांनी येत्या १५ दिवसांत सदर प्रश्न मार्गी लावले जातील असे लेखी आश्वासन दिले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी शालेय विद्यार्थी व उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्या उपोषणाची सांगता केली.

यावेळी माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, रघुनाथ तोकडे, दि. ना. उघाडे, महेश श्रीश्रीमाळ, तुकाराम वारघडे, विष्णु पाटील राव, सुनील जाधव, व्यंकटेश भागडे, रवी गव्हाणे, राजाराम धोंगडे, विष्णु धोंगडे, तुकाराम वारघडे, संजय धोंगडे, गोकुळ धोंगडे, दिलीप धांडे, किरण धांडे, रतन धांडे, सोमनाथ चारस्कर, प्रल्हाद धांडे, रवींद्र घाटेसाव, सागर हांडोरे, भास्कर आवारी, भाऊसाहेब कडभाने, कैलास कस्तुरे, सुरेश संधान, दत्तु गायकर, सजन नाठे, पंडित धांडे, अरुण भोर, ज्ञानेश्वर झोले, वसीम सैय्यद, रामदास गायकर, बापु वारघडे, अनिल गभाले आदींसह पाडळी देशमुखचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!