
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
घोटी बुद्रुक येथील हॉटेल साई दरबार पासून रेल्वे गेट रामराव नगर येथील घोटी ते जुना कोल्हार रोडचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. ह्या रस्त्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय होण्याबाबत महात्मा फुले समता परिषदेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष शिवा काळे यांनी निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. उपअभियंता कौस्तुभ पवार आणि गोडसे रावसाहेब यांनी शिवा काळे यांना लवकरच रस्त्याचे काम आणि नवीन पूर्ण रस्ता करण्यात येईल असे सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून तो पूर्णपणे खराब झाला आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. ह्या रस्त्यावर समृद्धी महामार्गाच्या वाहनांची जास्त प्रमाणात ये जा चालू असल्याने संपूर्ण रस्ता उखडून गेला आहे. रस्त्यावरील धूळ जास्त प्रमाणात असून स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा ये जा करताना मानसिक त्रास होत असतो. अधिकाऱ्यांनी प्राधान्य देऊन नवीन डांबरीकरण रस्ता मंजूर करण्यात यावा असे निवेदनात शेवटी म्हटले आहे.