शौचालयाचे अनुदान नको पण इगतपुरीच्या स्वच्छ भारत कक्ष कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची लाभार्थ्यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

इगतपुरी पंचायत समितीच्या स्वच्छ भारत कक्षातील कर्मचारी राहुल नाईक व श्रीमती बगाड हे लाभार्थ्यांच्या शौचालय अनुदानाची प्रकरणे हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवतात. अनेकदा गहाळ सुद्धा करतात अशी अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे. गेल्या आठ नऊ महिन्यांपासून अडसरे बुद्रुक येथील लाभार्थी अनुदानाच्या चौकशीसाठी वारंवार चकरा मारत आहेत. या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता हे अरेरावी व मनमानी पद्धतीने लाभार्थींशी वर्तणूक करतात. उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवणूक करतात. गेल्या आठ नऊ महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून आता अनुदानच नको अशी मानसिकता या लाभार्थ्यांची झाली आहे

अनुदानाच्या रकमे इतकी रक्कम आमची गाडी भाड्यात खर्च झाली असल्याचे लाभार्थींची ओरड आहे. अनुदान नको पण या उद्धट कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अडसरे बुद्रुकचे नामदेव साबळे, शिवाजी चौरे आदी लाभार्थींनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आणि सभापती सोमनाथ जोशी यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, प्रस्तुत प्रकरणी माहिती घेऊन हेतुपुरस्सर विलंब लावला गेला असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!