इगतपुरीच्या तळेगांवात २५ ते ३० कुटुंबे पितात चक्क सार्वजनिक शौचालयातून आणलेले पाणी : माजी उपनगराध्यक्ष फिरोज पठाण यांनी घातले लक्ष

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

आदिवासी आणि दलित वस्तीतील काही कुटुंब नाईलाजाने इगतपुरी शहरातील तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयाच्या पाण्याच्या टाकीतून पिण्यासाठी पाणी भरत आहेत. गावाजवळ धरण असतांना शौचालयातून पाणी भरणे हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे. अनेक दिवसांपासून हे सुरू असून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांच्या सतर्कतेने ही घटना उघडकीस आली आहे. यानंतर श्री. पठाण यांनी इगतपुरी नगरपरिषदेला खडसावल्याने त्यांनी एक नळाची जोडणी केली. तथापि ह्या नळाला चार दिवसांपासून अद्यापही पाणी आलेले नाही.

इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव परिसरात आदिवासी आणि दलीत वस्तीतील नागरिक सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पिण्याचे पाणी भरत असतात. या शौचालयात लाईटची व्यवस्था नसून वस्तीतील 25 ते 30 कुटुंब या सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पाणी भरत आहेत. नगरपरिषदेस वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेत नसल्याने आम्हाला येथून पाणी भरावे लागते असा आरोप नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी नागरिकांनी माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे  प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांच्याकडे व्यथा मांडल्या. त्यानुसार पालिकेने लावलेल्या नळाला पाण्याची प्रतीक्षा आहे. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष धुमधडाक्यात साजरा होत असताना तळेगाव येथील पाण्याचा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!