कवडदरा येथील एनडीसीसी बँकेसमोर सोपान घोरपडे यांचे चार दिवसांपासून उपोषण सुरूच

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील सोपान चिमाजी घोरपडे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसाठी त्यांनी भाडोत्री दिलेले घर क्र. 23 चे थकीत भाडे आणि फरक मिळावा यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. ऑक्टोंबर 2018 पासून दरमहा रुपये 10 हजार 300 रुपये वाढीव भाडे रक्कम फरकासह मिळण्यासाठी बँक सहकार्य करीत नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इगतपुरी वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. एन. पी चव्हाण, ॲड. जयश्री चव्हाण, बाजार समितीच्या माजी उपसभापती छाया चव्हाण यांनी भेट दिली. भाजपा तालुका उपाध्यक्ष रमेश निसरड, गणेश सावळीराम रोंगटे, शिवसेना शाखाप्रमुख बाळू टोचे, बळीराम रोंगटे, सावळीराम रोंगटे, गुणाजी रोंगटे, बाळू रोंगटे, निवृत्ती रोंगटे, पांडुरंग रोंगटे यांनीही पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!