ह्या आठवड्यात इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होणार ?

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

गेल्या काही दिवसांपासून ५ वर स्थिर असलेली कोरोना रुग्णांची संख्या आज १ वर आली आहे. आधीपासून उपचार सुरू असलेल्या पाचही रुग्णांनी आज कोरोनामुक्तीचा अनुभव घेत घरचा रस्ता धरला. आज १ नवीन रुग्ण आढळून आला आहे. आज आढळून आलेला हा रुग्ण सध्या तालुक्यातील एकमेव कोरोना रुग्ण आहे. त्याचीही लवकरात लवकर कोरोनापासून सुटका होऊन इगतपुरी तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर यावी अशी अपेक्षा तालुकावासिय बाळगून आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ५ वर स्थिर असलेली रुग्णसंख्या कोरोनामुक्तीच्या मार्गातला मोठा अडथळा होती. मात्र आज एकच दिवशी त्या पाचही रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला, हे विशेष !

दरम्यान रुग्ण संख्या अवघी एक जरी असली तरी कोरोनामुक्तीची वाटचाल अजून तरी पूर्ण झालेली नाही, त्यामुळे सामान्य नागरिकांनी हयगय न करता कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, लक्षणे आढळून आल्यास आजार न लपवता तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!