कवितांचा मळा : लॉकडाऊन – एक आजार

कवी - शशिकांत भगवान तोकडे, घोटी
संवाद : 7083020259

म्हणती माझी माय, बाळा नको जाऊ तु बाहेर
काळजी वाटते रे मला तुझी, कारणं बाहेर आहे तो आजार,

कोण्या दुष्मनानं केला घात, आणून टाकीला वेशीवर
राहू आपण घरात, खाऊ मिरची भाकरं,

आसवं येती डोळ्यांच्या बाहेर, त्यांना नाही आधार
सांभाळून आसवांचा भार करू त्या आजारावर वार,

सुखात होतो आपण, पण घातलंय पांघरून त्या सुखावर
पाहिलं नव्हतं दुःख कधी, पण आणलंय दुःख साऱ्या जगावर,

संकट आलंय मोठं, नजर त्याची सृष्टीवर
धावा करतो रे देवा तुझी,तरी अजून तु विटेवर,

गाऱ्हाणं ऐक आमचं, अन उघड तुझं दारं
घेऊन हाती शस्त्र, अन कर या राक्षसाला ठार,

आई माझी साधी भोळी, काळजी माझी  तिला फार
झेलील गं आई तुम्हा सर्वांवरचे वार माझ्या जीवावर,

यावर म्हणते माझी माय…
हजारो पडलेत रे मृत्युमुखी, या युद्धाच्या धरतीवर.
म्हणून म्हणते बाळा नको जाऊ  तु बाहेर, नको जाऊ तु बाहेर