
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर फांगुळगव्हाण येथे घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रतिभा हिरे, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोडे मॅडम, भामरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. सात दिवसाच्या शिबिरात विविध वक्त्यांनी व संस्थेच्या मान्यवरांनी हजेरी लावली. राष्ट्रीय सेवा संघाचे प्रचारक कृष्णाजी घरोटे यांनी पंच परिवर्तन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करियर कट्टाचे तालुका समन्वयक प्रा. रवींद्र नाडेकर यांनी स्पर्धा परीक्षा व करिअरच्या विविध संधी यावर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळेतील कबड्डी व खो-खो खेळांसाठी मैदान तयार करण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नशा मुक्त व व्यसनमुक्त भारत या विषयावर रॅली काढली. शिबिरासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश कासार, प्रा. सचिन मुसळे यांचे सहकार्य लाभले.