“ह्या” महिन्यात होऊ शकते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक : आरक्षणावर “काय” होईल परिणाम ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या पूर्वीप्रमाणे करण्याबाबत अध्यादेश प्रसिद्ध झाला. मात्र ह्या निर्णयामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कमीतकमी 5 महिने लांबणीवर जाऊन पडल्या आहेत. नव्याने निर्माण केलेल्या गट आणि गणात तयारी करून बसलेल्या अनेक उमेदवारांना यामुळे चांगलाच फटका बसला आहे. आतापर्यंत केलेला खर्च वाया गेला […]

दुखणे आरक्षणाचे – जिल्हा परिषद गटांची नवी रचना रद्द ; जुनी रचना कायम ? : काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने निघणार आरक्षण ?

इच्छुक उमेदवारांचे धाबे दणानले ; काहींना फुटले धुमारे इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांची गटरचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत वाढलेले गट कमी करून पूर्वीच्या जुन्या गटांची रचना कायम करण्यात येणार आहे. परिणामी मागील आठवड्यात काढलेले आरक्षण मातीमोल ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने आरक्षण काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागेल. अनेक […]

दुखणे आरक्षणाचे – “ह्या” जिल्हा परिषद गटाचे बदलणार आरक्षण : जिल्ह्यातील अन्य गटांवरील आरक्षण सुद्धा बदलण्याची शक्यता वाढली

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा, न्यूज, दि. ३ महत्वाचे : ह्या बातमीची कॉपी करून अन्य माध्यमात प्रसिद्ध केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मागील आठवड्यात आरक्षण काढण्यात आले. ह्यामुळे कुठे धुमारे अन कुठे फवारे असे वातावरण जिल्हाभर निर्माण झाले. विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुद्धा सुरु करून जनसंपर्क वाढवला. आरक्षणामुळे अनेक बड्या […]

वाडीवऱ्हे गटातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉ. संजय जाधव करणार उमेदवारी : एसएमबीटी रुग्णालयात प्राध्यापक असणारे डॉ. जाधव उच्चशिक्षित उमेदवार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित झाल्याने लोकांच्या सेवेसाठी ह्या गटातून उमेदवारी करणार आहे. या माध्यमातून गटासह इगतपुरी तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध राहील. माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा जनसेवेसाठी करण्यासाठी मी वाडीवऱ्हे गटातून उमेदवारी करणार असल्याची माहिती डॉ. संजय दामू जाधव यांनी दिली. सालगाडी कुटुंबातून अनेक समस्यांचा सामना […]

…. तर जिल्हा परिषद निवडणुका होतील रद्द आणि नव्याने निघणार आरक्षण !

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ बहुप्रतीक्षा करायला लावणारी नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण प्रक्रिया अखेर मार्गी लागली. विविध राजकीय पक्षांनी निवडणुकांचे सूक्ष्म नियोजन सुरुही केले. संभाव्य उमेदवार कामाला लागून सोशल मीडियावर चांगलीच धूम सुरु झाली. निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा सुरु होऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु झाल्या. मात्र नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीला आणि निघालेल्या आरक्षणाला मोठे […]

नवे नेतृत्व निर्मित करणारे आणि अनेकांच्या मनसूब्यांवर पाणी फिरवणारे आरक्षण : इगतपुरी तालुक्यातील गट आणि गणांच्या निवडणुकीचा मागोवा

लेखन – भास्कर सोनवणे, मुख्य संपादक महत्वाची सूचना : ह्या लेखाची कॉपी करण्याला परवानगी नाही. वाडीवऱ्हे ह्या जिल्हा परिषद गटातून इगतपुरी तालुक्याला नवे नेतृत्व निर्मित करुन देणारे आरक्षण पडले असल्याची ऐतिहासिक बाब आहे. वर्षानुवर्षे प्रस्थापित राजकीय नेत्यांना सहाय्य करणाऱ्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचे नवे नेतृत्व ह्या गटामधून इगतपुरी तालुक्याला लाभणार आहे. घोटी ह्या महत्वपूर्ण गटातुन अभूतपूर्व […]

इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर : प्रस्थापितांना दे धक्का देणारे आरक्षण

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटांपैकी 2 गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. 1 गट सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाला. बहुचर्चित घोटी गटामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षण पडल्याने ह्या गटात तुल्यबळ लढती होणार आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, नांदगाव सदो, खंबाळे, धामणगाव, घोटी ह्या ५ जिल्हा […]

इगतपुरी पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण जाहीर : इच्छुकांच्या तयारीला येणार वेग

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी पंचायत समितीच्या १० गणांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यातील ५ गण विविध प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. एकूण १० पंचायत समिती गणांपैकी अनुसूचित जमातीसाठी 2, अनुसूचित जमाती महिला 2, अनुसूचित जातीसाठी १, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 3 गण, सर्वसाधारण महिला साठी 2 गण आरक्षित करण्यात आले. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे […]

मतदार यादी तपशील प्रमाणिकरणासाठी आधार क्रमांकाची माहिती द्या : आधारची माहिती ऐच्छिक ; मतदारांनी पुढाकार घेऊन मोहीम यशस्वी करण्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असून या सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादीतील तपशील प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलित करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२२ रोजी पहिल्या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती […]

इगतपुरीनामाची बातमी खरी ठरली – अखेर माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचा शिवसेनेला “जय महाराष्ट्र” : शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आपल्या अनेक समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा झेंडा हाती घेतला आहे. 24 जुलैला इगतपुरी तालुक्यातील एक माजी आमदार कार्यकर्त्यांसह शिंदे गटाच्या वाटेवर ? ही बातमी सर्वप्रथम “इगतपुरीनामा”ने प्रकाशित करून पक्षांतर होणार असल्याचे संकेत दिले होते. इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी इगतपुरी तालुक्यातून आज […]

error: Content is protected !!