इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आपल्या अनेक समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा झेंडा हाती घेतला आहे. 24 जुलैला इगतपुरी तालुक्यातील एक माजी आमदार कार्यकर्त्यांसह शिंदे गटाच्या वाटेवर ? ही बातमी सर्वप्रथम “इगतपुरीनामा”ने प्रकाशित करून पक्षांतर होणार असल्याचे संकेत दिले होते. इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी इगतपुरी तालुक्यातून आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई गाठून शिंदे गटाचा झेंडा हाती धरला. शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत त्यांनी पक्षांतर केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, माजी सभापती रघुनाथ तोकडे, संजय आरोटे असे अनेक कार्यकर्ते होते असे समजते. यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आणि इगतपुरी नगरपालिका निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांची चर्चा सुरु झाली आहे. इगतपुरीनामा हे विश्वसनीय बातम्या देणारे न्यूज पोर्टल असून त्यांनी केलेल्या बातमीची सत्यता आज अधोरेखित झाल्याने वाचकांनी अभिनंदन केले.
इगतपुरीनामाची आधीची बातमी वाचा
https://bit.ly/3otsiEW