इगतपुरीनामा न्यूज दि. ०६ : इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी मंदीर येथे उद्या पासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. उद्या सुरू होत असलेल्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मंदिर परिसरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. खराब रस्त्यांमुळे भक्ताची होणारी गैरसोय पाहता घाटनदेवी ट्रस्टने रस्त्याच्या डागडुजीे साठी MNEL प्रशासनाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देवून MNEL घोटी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ नाशिक जिल्ह्यातील रांजणगिरी किल्ल्याच्या समोर आणि घारगड किल्ल्याच्या बाजूला एक सुळका आहे. हा सुळका डांग्या सुळका नावाने प्रसिद्ध आहे. या सुळक्याची उंची ३०० फूट असून अत्यंत कठीण चढाई आहे. याचा माथा गाठण्यासाठी गिर्यारोहकांना दोराच्या साहाय्याने चढावे लागते. 90 अंशाच्या डिग्री मध्ये असलेला हा सुळका शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती परिवाराच्या 14 सदस्यांनी सर […]
त्रिंगलवाडी किल्ल्याबाबत माहिती हवीय का ? इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी किल्ला आणि परिसरात पर्यटनाच्या अनुषंगाने इगतपुरीच्या वन विभागाने विशेष लक्ष घातले आहे. अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करून किल्ला परिसराची ख्याती सर्वदूर पोहोचवण्यासाठी वन विभागाकडून पावले उचलली जात आहेत. आगामी काळात ऐतिहासिक वारसा लाभलेला त्रिंगलवाडी किल्ला पर्यटनासाठी अतिशय देखणा होणार आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज दि. २८ : राष्ट्रीय महामार्ग विभागाने खासदार हेमंत गोडसे यांच्या नाशिक-मुंबई महामार्गाच्या पाहणी दौऱ्याची आणि तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. टोल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच नाशिक-मुंबई महामार्गाची दुरावस्था झाल्याचा ठपका ठेवला असून महामार्गाच्या दुरुस्तीसाठी १५ ऑक्टोंबर पर्यंन्तचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत महामार्गाची संपूर्ण दुरुस्ती न झाल्यास मुंबई-नाशिक एक्सप्रेसवे प्रा. लिमीटेड या टोल कंपनीच्या […]
समाधान कडवे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्वाचे अप्पर वैतरणा धरण 98.70 टक्के भरले आहे. आज धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यासह मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अप्पर वैतरणा धरण एक महिन्याने उशिरा भरले आहे. आज तीन सांडव्याचे एक फुट गेट उचलत 1865 क्युसेक्सने विसर्ग […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या इगतपुरी तालुक्यातील भाम धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना हेक्टरी ९ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. दुसरीकडे बांधण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्गातील प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी ७ लाख ५० हजार रुपयांचा मोबदला दिला गेला. त्यामुळे भाम प्रकल्पग्रस्तांमध्ये मोबदल्याच्या बाबतीत भेदभाव झाल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी थेट आमदार हिरामण खोसकर […]
शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाजवळ असलेल्या कुरुंगवाडी येथील कुलंग गडावर बडोदा येथील 13 पर्यटक काल फिरण्यासाठी आले होते. किल्यावर फिरत असताना ते रस्ता भरकटले. त्यात उशीरही झाल्यामुळे त्यांनी रात्री तेथेच थांबण्याचे ठरवले. मात्र जंगलाचा परिसर असल्याने त्यांना भीती वाटायला लागली. नशीब चांगले म्हणून त्यांच्या मोबाइलला नेटवर्क होते. त्यांनी रात्री ३ […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ इगतपुरी तालुक्यातील भावली, वैतरणा, भाम धरण आणि कळसुबाई शिखर रांगेतील गडकिल्ल्यांचा परिसर व्यावसायिकांसाठी व पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना इगतपुरी तालुक्याच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना आज निवेदन देण्यात आले. सध्या इगतपुरी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुक्याला रामायण कालीन आणि महाभारतकालीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. ह्याच्या पाऊलखुणा आजही इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात आढळून येतात. प्रभू श्रीरामाच्या वनवास काळात ही भूमी पावन झालेली आहे. प्रभू श्रीराम यांचे आराध्यदैवत म्हणजे शिव शंकर. ह्या शंकराची पूजा प्रार्थना करतांना रामरायांनी स्थापलेली अनेक शिवलिंगे आहेत. असेच अनेक वर्षे कोणाच्या दृष्टीला न […]
इगतपुरीनामा न्यूज दि. ७ : कोरोना विषाणूच्या विळख्यातून इगतपुरी तालुक्याची सुटका होते आहे असे चित्र निर्माण होवू लागले असतांनाच काल अनाहूतपणे डेल्टा विषाणूने तालुक्यात शिरकाव केला आहे. काल आलेल्या अहवालानुसार डेल्टा विषाणूचे नाशिक जिल्ह्यात तीस रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण घोटी शहरातील असल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. आरोग्य यंत्रणेच्या अहवालाने सुध्दा या […]