इगतपुरी तालुक्यातील धरणे आणि गडकिल्ल्यांचा परिसर व्यावसायिक व पर्यटकांसाठी खुला करा : भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

इगतपुरी तालुक्यातील भावली, वैतरणा, भाम धरण आणि कळसुबाई शिखर रांगेतील गडकिल्ल्यांचा परिसर  व्यावसायिकांसाठी व पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना इगतपुरी तालुक्याच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना आज निवेदन देण्यात आले.

सध्या इगतपुरी तालुका जवळपास कोरोनामुक्त झालेला आहे.  सुरू असलेली पावसाळ्यात इगतपुरी तालुक्यातील गडकिल्ले, डोंगरदऱ्या हिरव्या वनराईने व पाण्याच्या धबधब्यानी नटलेल्या  आहेत. भावली, भाम धरण पाण्याने ओव्हरफ्लो झालेले आहे. असे मनमोहक निसर्गसौंदर्य बघण्यासाठी  मुंबई, नाशिकचे पर्यटक परिवारासह मोठ्या प्रमाणावर तालुक्यात येत असतात. त्यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांचे छोटे, मोठे व्यवसाय चांगले चालतात. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो. सद्यस्थितीत  भावली, भाम धरण, गडकिल्ल्यांवर व इतर परिसरात पर्यटकांना जाण्यासाठी पोलीस प्रशासन मज्जाव करतात. पर्यटकांना मज्जाव करू नये. त्यामुळे छोट्या, मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना व इतर व्यावसायिकांना फायदा होईल. प्रशासनाने तालुक्यातील पर्यटन खुले करून स्थानिक व्यावसायिकांना बिनशर्त परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनात करण्यात आली. मागण्यांबाबत शासनस्तरावर कळवून परवानगीबाबतचा निर्णय घेण्यात येईल. स्थानिकांना योग्य ते साहाय्य करु असे आश्वासन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी राजसैनिकाना दिले.

याप्रसंगी मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, उपजिल्हाअध्यक्ष आत्माराम मते, कायदे विधी तालुकाध्यक्ष सुशील गायकर, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, उपतालुकाध्यक्ष संजय सहाणे, रामदास चव्हाण, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, सरपंच रामदास आडोळे, गोटीराम शेलार, गटप्रमुख नागेश गायकर, गटप्रमुख एकनाथ गायकर, कार्तिक गतीर, संदीप नाठे, रावसाहेब सहाणे, माधव दळवी, राहूल गायकर, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे आदी राजसैनिक उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!