मुंबईला पाणी पुरवठा करणारे वैतरणा धरण ओव्हरफ्लो : गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना उशिराने भरले

समाधान कडवे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्वाचे अप्पर वैतरणा धरण 98.70 टक्के भरले आहे. आज धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यासह मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अप्पर वैतरणा धरण एक महिन्याने उशिरा भरले आहे. आज तीन सांडव्याचे एक फुट गेट उचलत 1865 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला असुन कालव्याद्वारे 450 क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांची अखेर चिंता मिटली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना उशिराने हे धरण भरले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत  सुरूवातीपासुनच धरण क्षेत्रात मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने आज अखेर अप्पर वैतरणा धरण दुपारी दोन वाजता ओव्हरफ्लो झाले असून 98. 70 टक्के भरल्याने सांडव्याद्वारे 1865 क्युसेक्सने तर कालव्याद्वारे 450 क्युसेक्सने  विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासुन संततधार सुरू असुन धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. धरण क्षेत्रात पाण्याचे आवक वाढल्यास सांडव्याद्वारे आणखी  विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो असा अंदाज आहे. त्या दृष्टीने वैतरणा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता निलेश वन्नेरे, शाखा अभियंता भुषण दळवी आदींसह कर्मचारी लक्ष ठेवुन असुन योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

अप्पर वैतरणा धरण परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षीत करत असतो. मात्र गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात परिसराकडे पाठ फिरवली असुन थोड्या फार प्रमाणात पर्यटक येत आहे. अप्पर वैतरणा धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असुन डोंगर दऱ्यावरून कोसळणारे पाणी मोठ्या प्रमाणात असुन छोटे – मोठे अनेक धबधबे बघायला मिळतात. परिसरात धबधब्यांसह धुके व संपुर्ण परिसर हिरवामय झाल्याने या परिसराचे आकर्षण कायम असते.

अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो
मागील वर्षी 30 ऑगस्ट 2020
यावर्षी 14 सप्टेंबर 2021

पाणी पातळी :- 1979. 65 फूट
उपयुक्त पाणी साठा :-327.06 द.ल.घ.मी.
एकूण पाणी साठा :-  349.71 द.ल.घ.मी.
टक्केवारी :- 98.70
आजचा पाऊस :- 73 मिमी
यावर्षी एकूण पाऊस :- 2200 मि.मी.
मागील वर्षीचा एकुण पाऊस 2322 मिमी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!