इगतपुरी तालुक्यातील कुलंग किल्यावर भरकटलेल्या १३ पर्यटकांना ७ तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप उतरवण्यात यश

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाजवळ असलेल्या कुरुंगवाडी येथील कुलंग गडावर बडोदा येथील 13 पर्यटक काल फिरण्यासाठी आले होते. किल्यावर फिरत असताना ते रस्ता भरकटले. त्यात उशीरही झाल्यामुळे त्यांनी रात्री तेथेच थांबण्याचे ठरवले. मात्र जंगलाचा परिसर असल्याने त्यांना भीती वाटायला लागली. नशीब चांगले म्हणून त्यांच्या मोबाइलला नेटवर्क होते. त्यांनी रात्री ३ वाजेच्या सुमारास नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला संपर्क केला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमने इगतपुरी तहसीलदारांच्या मदतीने कुरुंगवाडी गाठले. तेथे स्थानिकांच्या मदतीने त्यांनी शोध मोहीम सुरू केली. दहा जण वेगवेगळ्या दिशेला शोध घेत होते. मोबाईल नेटवर्क असल्यामुळे पर्यटक सतत आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचा संपर्कात होते. अखेर ७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना खाली आणण्यात यश आले 

अडकलेल्या पर्यटकांमध्ये आकाश विजयकुमार कसोरे, विजय दिनेश सोलंकी,  माधवी अजित वामतोरे, प्रभू दस्त मासी प्रसाद, ग्लिम्स पंकज रॉयल, ग्लोरियस पंकज रॉयल, स्टेलोंन सुभाषकुमार क्रिस्टी,नीता संतोष मिश्रा, न्यास संतोष मिश्रा, चिलसी मेहुल परमार, रेक्स निसन मास्टर, प्रमोद अँडरसन, जोशीन देवेन राहणार बडोदा गुजरात यांचा समावेश होता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!