
इगतपुरीनामा न्यूज दि. ०६ : इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी मंदीर येथे उद्या पासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. उद्या सुरू होत असलेल्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मंदिर परिसरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. खराब रस्त्यांमुळे भक्ताची होणारी गैरसोय पाहता घाटनदेवी ट्रस्टने रस्त्याच्या डागडुजीे साठी MNEL प्रशासनाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देवून MNEL घोटी टोल तर्फे आज मंदिर परिसरातील रस्त्याची दुरूस्ती आणि डागडुजी करण्यात आली. सदर कामात प्रकल्प अधिकारी राकेश ठाकुर व महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे यांच्यासह सुरक्षा अधिकारी सनोज कुमार, शैलेद्र द्वीवेदी, ऊमेर शेख, सुदाम जाधव, वसंत भागडे आदी उपस्थित होते.