इगतपुरीनामा न्यूज – देशाच्या मोठे उद्योगपती असणाऱ्या अंबानी कुटुंबाच्या पाहुणचाराचा आनंद इगतपुरी तालुक्यातील दुर्गम मोडाळे येथील ५० विद्यार्थिनींनी लुटला. आज दुपार आणि रात्रीचे सुग्रास भोजन मुंबई येथील अंबानी यांच्या कार्यालयात देण्यात आले. निता अंबानी यांनी सर्व विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधून खेळीमेळीच्या वातावरणात मुलीच्या प्रगतीचा आढावा घेतला. मुंबई येथे सुरु असलेला मुंबई इंडियन्स विरुद्ध कलकत्ता दरम्यान […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – सह्याद्रीची पर्वतरांगेतील अनेक गड किल्ल्याना शिवकालीन वारसा असून यातील अलंग, मदन आणि कुलंग किल्ले अत्यंत खडतर समजले जातात. धाडसी गिर्यारोहकही या किल्ल्यापुढे नतमस्तक होऊन टप्प्याटप्प्याने हे तिन्ही किल्ले सर करतात. मात्र घोटीतील एका धाडसी आणि जिद्दी चिमुकल्याने आपल्या वडिलांच्या साथीने एकाच वेळी हे तिन्ही किल्ले सर करून इगतपुरी तालुक्याच्या शिरपेचात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि ६ – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ग्रामदेवता भवानी माता जंगी यात्रोत्सवानिमित्त आज सकाळपासून भवानी मातेच्या पूजेसाठी आणि दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली. विविध वस्तूंच्या दुकानामध्ये खरेदी झाली. गोंदे दुमाला येथील सर्व ग्रामस्थ पारंपरिक फेटे बांधून प्रचंड उत्साहात सहभागी झाले. संपूर्ण गावातून भवानी मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या भव्य शोभायात्रेत ग्रामस्थांच्या एकोप्याचे दर्शन झाले. […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – मुंबई आग्रा महामार्गावरील राजूर पाटीजवळील हॉटेल नाशिक इन अल्प कालावधीतच अधिकच लोकप्रिय होतंय. वर्षभर मराठमोळ्या शाकाहारी भोजनाची अस्सलदार लय भारी चव चाखण्यासाठी खवय्यांची वर्दळ वाढतांना दिसत आहे. अनेक ग्राहकांच्या मनामनात या हॉटेलबद्धल आपुलकी निर्माण झाली आहे. ह्या वर्षाचा ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी हॉटेलचे संचालक राजन कश्यप, गोकुळ […]
वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 19 इगतपुरी शहर व परिसरातील नैसर्गिक संपदा, सह्याद्रीच्या रांगेतील डोंगर, भावली धरण, धबधबे परिसर आदी पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. शहरातील व्यापारासह भौगोलिक, आर्थिक विकासाला अधिक महत्व प्राप्त व्हावे याकरीता इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील पर्यटनाचा विकास साधुन प्रग्या फिल्मस् या प्रॉडक्शन हाऊसने लघुचित्रपटाची संकल्पना राबविली. या चित्रपटाच्या माध्यमातुन शहर व […]
सह्याद्रीच्या कुशीत नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर धानोशी ठोकळवाडी ह्या गावी डोंगरातील गुहेत जागृत स्वयंभू आई चौराई मातेचे नैसर्गिक मंदिर आहे. जे एकमेव देवस्थान असेल जेथे गुहेत उंच डोंगराच्या पोटी बारमाही पाणी असलेली गुहा आहे हे विशेष..! मंदिरात जाण्यासाठी टाकेद परिसरातील धानोशी गावातून थेट डोंगर चढून वर जावे लागते. धानोशी ठोकळवाडी गावची ग्रामदैवत असलेली चौराई […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २ साप म्हटला की अनेकांना दरदरून घाम फुटतो तर काहींची बोबडी वळते. यापूर्वी सापांविषयी अनेक गैरसमज असल्याने ‘दिसला की ठेचला’ या वृत्तीने मारले जायचे. सापांविषयी गैरसमज दूर व्हावेत, लोकांचे प्रबोधन व्हावे आणि सापांना जीवदान मिळावे यासाठी मध्यंतरी सर्पमित्रांनी मोहीम हाती घेऊन सर्प वाचविण्यासाठी प्रयत्न केलेत. या मेहनतीचे फळ आता ग्रामीण भागात दिसू […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आंघोळीसाठी गेलेला एक तरुण वाहून गेल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. चार मित्रांच्या सोबत धरणात हा युवक बुडाल्याने मित्रांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. अखेर प्रशासनाला माहिती देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन टीम आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या पथकातर्फे शोधकार्य सुरु […]
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला इगतपुरी तालुका हा निसर्ग सौंदर्याची खाण आहे. डोंगर दऱ्या, झाडी, धबधबे आणि विशाल धरणे ही पावसाळी पर्यटनाची खास ठिकाणं पर्यटकांना सतत आकर्षित करत असतात. निवृत्ती नाठे यांच्या कॅमेऱ्याने टिपलेली मॉन्सून टुरिझमची ही खास सफर व्हिडिओच्या माध्यमातून खास आपल्यासाठी.. 1अमेझॉनच्या जंगलाचा अनुभवhttps://youtu.be/7fRvRIxDXV0 2 कुरुंगवाडी धबधबाhttps://youtu.be/s8b1nwAthV0 3 देव बांध धबधबाhttps://youtu.be/INMtfKnRcEI 4 गडद धबधबाhttps://youtu.be/Q2wivhX0Oxc […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० तापमानात होत असलेली वाढ, बदललेले निसर्गचक्र अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी आणि दुष्काळ या माध्यमातून निसर्ग प्रत्येकाला अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. पर्यावरणाचे असंतुलन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाजी गरज असल्याचे इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्रात वन महोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे […]