३१ डिसेंबरला चोखंदळ खवय्यांच्या शुद्ध शाकाहारी जेवणाची लज्जत वाढवणारे हॉटेल नाशिक इन : मुंबई आग्रा महामार्गावरील राजूर पाटीजवळ लोकप्रिय असणारे हॉटेल नाशिक इन

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – मुंबई आग्रा महामार्गावरील राजूर पाटीजवळील हॉटेल नाशिक इन अल्प कालावधीतच अधिकच लोकप्रिय होतंय. वर्षभर मराठमोळ्या शाकाहारी भोजनाची अस्सलदार लय भारी चव चाखण्यासाठी खवय्यांची वर्दळ वाढतांना दिसत आहे. अनेक ग्राहकांच्या मनामनात या हॉटेलबद्धल आपुलकी निर्माण झाली आहे. ह्या वर्षाचा ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी हॉटेलचे संचालक राजन कश्यप, गोकुळ राव यांनी ग्राहकांसाठी विशेष सुविधा दिली आहे. भोजणाची चांगली सुविधा देत असल्याने अनेक ग्राहकांचा ताफा या ठिकाणी जेवणासाठी गर्दी करतांना  दिसत आहे. वर्ष अखेरीच्या पार्श्वभूमीवर लज्जतदार शाकाहारी भोजनासाठी हॉटेल नाशिक इन हे सर्वोत्तम ठिकाण असल्याची प्रतिक्रिया लालसिंग शहा या ग्राहकाने दिली. ग्राहकांना उत्तम आणि दर्जेदार जेवणाची चांगली सुविधा मिळावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. जेवणाची चव चाखताना ग्राहक कौतुक करून जातात. हे आमच्या कामाचे फळ असून ग्राहकांना अधिकाधिक जेवणाच्या सुविधा  कशा मिळतील यावर आमचा कायमच भर आहे अशी प्रतिक्रिया हॉटेल नाशिक इनचे संचालक राजन कश्यप, गोकुळ राव यांनी दिली.

दररोज हॉटेल नाशिक इन मध्ये शुद्ध शाकाहारी लज्जतदार जेवण मिळते. ग्राहकांना भोजनासाठी सुसज्ज हॉल, आपल्या परिवारसह जेवण्यासाठी उत्तम सोय असल्याचे संचालक राजन कश्यप, गोकुळ राव यांनी सांगितले. या हॉटेलमध्ये पनीर टिक्का मसाला, पनीर कढई, पनीर तवा परी यासह चवदार भाज्यांची अस्सल चव चाखण्यासाठी ग्राहकांची नेहमी वर्दळ असते. तृप्त झालेले ग्राहक हॉटेल नाशिक इनचे कौतुक करून मार्गस्थ होतात. महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या अनेक परिवारांची पाऊले या हॉटेलात वळतात. विविध पदार्थांची उत्तम मेजवानी मिळवण्यासाठी माफक दरात हे हॉटेल खवय्यांच्या गर्दीने फुलत आहे. या हॉटेलच्या लज्जतदार पदार्थांची चव चाखण्यासाठी नक्की भेट द्यायला हवी असे हे लोकप्रिय ठिकाण आहे. हॉटेल नाशिक इनमध्ये जाण्यासाठी मुंबईकडून येतांना नाशिक महामार्गावर राजूर पाटीजवळ डाव्या बाजूला हे हॉटेल आहे. नाशिकच्या दिशेने येतांना उजव्या बाजूला हॉटेल आहे. चोखंदळ ग्राहक ह्या हॉटेलकडे वळल्याशिवाय राहत नाही.

Similar Posts

error: Content is protected !!