कामांचा तणाव दूर सारून शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी नासिक इंजिनिअर्स जिमखान्यातर्फे दावलेश्वर येथे वर्षा सहल : जिल्ह्यातील अनेक अभियंत्यांनी लुटला वर्षा सहलीचा आनंद 

इगतपुरीनामा न्यूज – अभियंता म्हटले की अचूकता, दर्जा व वेळेचे बंधन आणि कमतरता हे सर्व आलेच. ह्या सर्व गोष्टींसाठी शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्य देखील तेवढेच महत्वाचे ठरते. हे ध्यानात घेऊन दैनंदिन वेळापत्रकामध्ये स्वत:सह आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य, नैसर्गिक वातावरणात फिरण्यासाठी सुद्धा वेळ राखून ठेवलाच पाहीजे. ह्याचाच एक भाग म्हणुन नासिक इंजिनिअर्स जिमखाना नाशिक यांनी दिमाखदार वर्षा सहलींचे आयोजन केले होते. या उपक्रमात सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका नाशिक, जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद व इतर शासकीय विभागातील १०० हुन कार्यरत अभियंता व सेवानिवृत अभियंता यांनी वर्षा सहलीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. जलसंपदाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक इंजिनिअर जिमखाना नाशिकतर्फे दरवर्षीप्रमाणे एकदिवसीय वर्षा सहल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल जवळ निसर्ग संपन्नतेचा वरदान लाभलेल्या श्री क्षेत्र दावलेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आली. जिमखाना कार्याध्यक्ष इंजि. हरिभाऊ गिते यांच्या मार्गदर्शनाखाली इंजि. रवींद्र कहाणे यांनी ही वर्षा सहल अथक परिश्रम घेऊन यशस्वी पार पडली.

दावलेश्वर म्हणजे निसर्गाची किमया, दमनगंगा नदीचे सौंदर्य, घाटातून दिसणारा अप्रतिम निसर्ग आणि दरीच्या दोन्ही बाजूंना डोंगरावर उंच उंच झाडे पाहून जणू काश्मीरचा अनुभव ह्या वर्षा सहलीत अभियंत्यांनी घेतला. बाराही महिने झरा खळखळून वाहतो दावलेश्वरचा झरा डोळ्यांची पारणे फेडतो. हा झरा दमनगंगा नदीला मिळतो. तेथेच असलेल्या भगवान शंकराच्या पिंडीच्या दर्शनाचा लाभ श्रावण महिन्यात सर्वांना झाला. वनवास काळात प्रभू श्रीराम व सीतामाता येथेच वास्तव्यास होत्या. सीता मातेने बनवलेली मातीची पिंड अनेक वर्ष अज्ञात होती. परंतु येथे तपश्चर्या करणाऱ्या सद्गुरु महाराज देवडोंगरीकर बाबा यांनी ही पिंड पुजली. दमणगंगा नदीवरील ऋषा डोहावर बसून अठरा वर्ष ध्यानधारणा करून येथेच समाधी घेतली. येथील दमणगंगा खरोखरच वर्षा सहलीत अभियंत्यांचे मन मोहुन टाकलेल्या धबधब्याने सर्वाबाना खिळवून ठेवले. या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी अभियंत्यांकडुन उपयुक्त झाडांची रोपटी देण्यात आली. या वर्षा सहलीमध्ये जवळपास ७० अभियंत्यांनी त्यांच्या कुटुंबासह सहभाग घेतला. वर्षा सहलीमध्ये इंजिनिअर जिमखाना पदाधिकारी इंजि. संजय वाघ, इंजि. संदेश शिंदे, इंजि. समीर रकटे, इंजि. रवींद्र बागुल, इंजि. जयंत भदाणे, जलसंपदा विभागाचे माजी सचिव इंजि. प्रकाश भामरे आदींनी सहभाग घेतला.

Similar Posts

error: Content is protected !!