वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 19
इगतपुरी शहर व परिसरातील नैसर्गिक संपदा, सह्याद्रीच्या रांगेतील डोंगर, भावली धरण, धबधबे परिसर आदी पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. शहरातील व्यापारासह भौगोलिक, आर्थिक विकासाला अधिक महत्व प्राप्त व्हावे याकरीता इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील पर्यटनाचा विकास साधुन प्रग्या फिल्मस् या प्रॉडक्शन हाऊसने लघुचित्रपटाची संकल्पना राबविली. या चित्रपटाच्या माध्यमातुन शहर व परिसरातील पर्यटन जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करणार असल्याचे निर्माता पोपट गवांदे यांनी सांगितले. निसर्ग संपदा व पर्यटन क्षेत्राचा सखोल अभ्यास आणि पर्यटन क्षेत्राचा आढावा घेत सिने अभिनेत्री प्रसिध्द कलाकार यांनी प्रमुख भुमिका साकारून इगतपुरी पर्यटनाची ओळख महाराष्ट्रासह इतर राज्यात करून देत पर्यटकांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत अधिकाअधिक पर्यटनाचा विकास व शहरातील व्यापार उद्योगासह लहान व्यावसायिक, गृहोद्योग, महिला, युवा-युवती यांच्या विकासाला महत्व प्राप्त करून देेण्यासाठी प्रग्या फिल्मम्चा हा प्रयत्न असल्याचे सहनिर्माता तथा गीतकार राजेंद्र नेटावटे म्हणाले.
या लघुचित्रपटाचा शुभारंभ इगतपुरी हे तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक वसंत पथवे, वन अभिकारी भाऊसाहेब राव, गोपनीय विभागाचे निलेश देवराज यांच्या हस्ते करण्यात आला. प्रग्या फिल्मस्चे प्रोड्युसर तथा दिग्दर्शक पोपट गवांदे, सह दिग्दर्शक राजेंद्र नेटावटे, स्थिर चित्रिकरण प्रमुख हेमंत काळमेख, स्क्रीप्ट रायटर नौशाद जब्बार सैय्यद, एडीटर वेदांत सौंदाणकर, कॅमरामन योगेंद्र महाजन, मेकअप सौंदर्य विवेक कदम, केशभुषा जयश्री गाडे, कास्टींग डायरेक्टर वैभव वाघ, अभिनेत्री रोशनी, मयुरी यांच्यासह सहाय्यक कलाकार धनश्री उपाध्ये, राजश्री चौरे, रिया चौरे, अलिशा कोकणे, टेक्नीशीयन शिवा भालेराव, विजय पाटील, संकेत कोरडे, हरिष वळकंदे, टीम व्यवस्थापक अनिल गभाले यांनी विशेष परिश्रम घेतले.