आमदारकीसाठी इगतपुरी मतदारसंघात पक्षांतराचा जुना इतिहास : लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार का पक्षांतरे ?

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचा संपूर्ण इतिहास बंडखोरी आणि पक्षांतरे यांच्याशिवाय कधी पूर्ण होऊ शकत नाही. एका पक्षाने मोठे केल्यानंतर त्या पक्षाला झुगारून दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली जाण्याचा इथे इतिहास आहे. आमदारकी मिळवण्यासाठी असा आटापिटा ह्या मतदारसंघात बऱ्याचदा घडून आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी आणि पक्षांतराची स्थित्यंतरे […]

इगतपुरी तालुक्यातील विविध प्रश्न कधी सुटणार आहेत ?

भास्कर सोनवणे : संपादक इगतपुरीनामा – निसर्गसंपन्नता भरभरून लाभलेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका आदिवासीबहुल आहे. राजधानी मुंबईचे प्रवेशद्वार असणारा हा तालुका येणाऱ्या दशकभरात राज्याच्या नकाशावरून संपुष्टात येतो की अशी भीती आता वाटायला लागली आहे. शासनकर्त्यांकडून नवनवे प्रकल्प, योजना राबवायच्या झाल्यास त्याची सुरुवात इगतपुरी तालुक्याच्या बलिदानाने होत असते. इगतपुरी तालुका अस्तित्वात आला तेव्हा तालुक्याचे एकूण भौगोलिक […]

नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे दणदणीत यश : अध्यक्षपदी प्रमोद ठाकरे तर उपाध्यक्षपदी देवेंद्र हिरे यांचा विजय

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे मानद अध्यक्ष कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने संपूर्ण ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद सिताराम ठाकरे हे विजयी झाले. तर उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र कृष्णाजी हिरे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी संजय गिरी, महिला उपाध्यक्षपदी कांचन गुलाबराव आनट, कार्याध्यक्षपदी अशोक भिवराज […]

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील १ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरु : २० फेब्रुवारीपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्यवस्थापन

इगतपुरीनामा न्यूज – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १२७ इगतपुरी (अ. ज. ) विधानसभा मतदारसंघ अंतर्गत इगतपुरी तालुक्यात ५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत मतदान केंद्रावर नियुक्त करावयाच्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सखोल प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शंका निरसन व्हाव्यात यासह मतदान यंत्रावरील प्रक्रिया व्यवस्थित समजण्यासाठी हे प्रशिक्षण सुरु आहे. […]

नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडावी : इगतपुरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्या असुन यासाठी प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. युवकांनी गावनिहाय कमिटी तयार कराव्यात, विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन पक्ष वाढवावा असे आवाहन इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले यांनी केले. खंबाळे ता. इगतपुरी येथे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची […]

इगतपुरी तालुका शेतकरी विकास सहकारी संस्थेच्या १५ जागांसाठी निवडणूक घोषित

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका शेतकरी विकास सहकारी संस्थेचा संचालक सदस्यांचा कालावधी संपत असल्याने २०२३ ते २०२७ नवीन कार्यकारीणी निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती तालुका सहकारी निवडणुक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अर्चना सौंदाणे यांनी दिली आहे. नामनिर्देशन पत्र २१ डिसेंबर पासुन भरण्यास सुरुवात झाली असुन शेवटची तारीख २८ डिसेंबर दुपारी […]

ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर करायला ५ डिसेंबर पर्यंत मुदत ; अन्यथा होणार कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाग घेतलेल्या सर्व उमेदवारांनी ५ डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. निकाल घोषित झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत हा खर्च दाखल करणे गरजेचे आहे. यासाठी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. निवडणूक खर्च दाखल करण्याचा ३० दिवसाचा कालावधी विचारात घेता ट्रू वोटर ॲप डाऊनलोड […]

धारगावचे उपसरपंच म्हणून तानाजी खातळे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तानाजी भिवाजी खातळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीत तानाजी खातळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. ग्रामस्थ, महिला, युवक आणि समर्थकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. यावेळी सरपंच रेश्मा पांडू […]

नागोसलीच्या उपसरपंचपदी अशोक शिंदे यांची झाली बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नागोसली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे तरुण चेहरा या ग्रामपंचायतीला लाभल्याने तालुक्याउन कौतुक होत आहे. आज झालेल्या विशेष बैठकीत उपसरपंच पदासाठी अशोक दत्तू शिंदे यांचा एकमेव अर्ज विहित वेळेत आला.  त्यामुळे अध्यासी अधिकारी लोकनियुक्त सरपंच काशिनाथ होले यांनी उपसरपंच पदी अशोक दत्तू शिंदे […]

दौंडत उपसरपंचपदी स्मिता शिंदे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज – दौंडत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्मिता शिंदे यांची निवड झाली आहे. उपसरपंच निवडीसाठी झालेल्या बैठकीत स्मिता शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार अनिल मालुंजकर यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. बैठकीवेळी लोकनियुक्त सरपंच पांडुरंग मामा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोराडे, जया बोराडे, रत्ना गावंडे, रुपाली उदावंत, ज्ञानेश्वर शिंदे, […]

error: Content is protected !!