
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इगतपुरी शहराध्यक्ष आकाश पारख यांनी आज इंदिरा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्याचे माजी महसूलमंत्री तथा जेष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस नेते लकीभाऊ जाधव, इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकाश पारख यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला. इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी सूत्रबद्ध काम करू. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम उभे करू असा विश्वास आकाश पारख यांनी उपस्थित मान्यवरांना दिला. यावेळी इगतपुरी शहरातील इच्छुक उमेदवारांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते निवृत्ती पाटील कातोरे, गोविंद महाराज जाधव, मल्हारी मामा गटखळ, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे, सागर चव्हाण, किरण भोईर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना कामाला लागून यश संपादन करा अशा शुभेच्छा दिल्या.